Ahmednagar News ः शिकवणी सुटल्यावर सायकलवरुन घरी जात असलेल्या दोन बहिनींना तीन टारगट युवकांनी भर रस्त्यात अडवून त्यांची छेड काढली. तू माझ्यासोबत बोलत का नाहीस, तु एवढा भाव का खातेस, असे म्हणून हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. ही घटना वांबोरी परिसरात घडली. अक्षय मच्छिंद्र कुसमुडे, रोहन दिलीप कुसमुडे, ज्ञानेश्वर मारुती मानकर (सर्व रा. वांबोरी, ता. राहुरी) या तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेतील दोघी बहिणी १५ एप्रिलला सकाळी नऊ वाजता शिकवणी सुटल्यावर त्यांच्या सायकलवरुन घरी चालल्या होत्या. त्यावेळी तिघा जणांनी त्या दोन बहिणींना वांबोरी परिसरात एका निर्जन ठिकाणी रस्त्यात अडविले. आरोपी अक्षय मच्छिंद्र कुसमुडे, रोहन दिलीप कुसमुडे, ज्ञानेश्वर मारुती मानकर (सर्व रा. वांबोरी, ता. राहुरी) या तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
राहुरी पोलिसांनी या घटनेनंतर गंभीर दखल घेतली. राहुरी पोलीस पथकाने तिघाही युवकांना तत्काळ ताब्यात घेतले. पीडित मुलींच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात या तिघांना अटक करण्यात आली. या तिघांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार चंद्रकांत बऱ्हाटे करीत आहे.