अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना राहुल गांधी यांनी केंद्रातील माेदी सरकारावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यावर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींवर विशेषाधिकार भंगाचा आरोप करत नोटीस दिली. प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी हे आरोप सिद्ध करू शकत नसतील तर कारवाई निश्चित हाेईल, असे सांगितले.
विशेषाधिकार भंग प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पाठवलेल्या नोटीसवर लोकसभा सचिवालयाने पाठवलेल्या टीकेवर पलटवार करताना केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, “राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली जाईल. बिनबुडाचे आरोप केले आहे. आराेप सिद्ध करावे लागतील. ते न केल्यास त्यांच्यावर नक्कीच कारवाई हाेईल”.
संसद भवन संकुलात प्रसारमाध्यमांशी प्रल्हाद जोशी यांनी संवाद साधला. ते म्हणाले, “राहुल गांधी बिनबुडाचे आरोप करतात आणि त्या आरोपांची पडताळणी (सिद्ध) ही करत नाहीत. आपण सर्व देशातील जनतेला उत्तरदायी आहोत”. विशेषाधिकार भंग प्रकरणी कारवाई करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.