अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील खरवंडी इथल्या दुर्धर आजाराने त्रस्त आणि 95 टक्के अपंगत्वाने बाधित असलेल्या कल्पना आत्माराम अंदुरे (वय 45) यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात दोन वेळा अनुदानासाठी अर्ज दाखल केला. दोन्ही वेळचाअर्ज समितीच्या अधिकाऱ्यांकडून गहाळ झाला आहे. साडेतीन वर्षांपासून हा खेळ चालू असल्याने लाभार्थ्याची हेळसांड हाेत आहे.
कल्पना आत्माराम अंदुरे यांना दुर्धर आजार आहे. त्यांचा आैषधाेपचारांचा खर्च दाेन ते अडीच हजार रुपये आहे. सरपंच प्रदीप अंदुरे यांनी कल्पना अंदुर यांचे पती आत्माराम अंदुरे यांना संजय गांधी निराधार याेजनेचा प्रस्ताव दाखल करण्याचे सांगितले. अंदुरे यांनी उत्पन्नाचा दाखल काढला. तलाठी व मंडलाधिकारी यांचा अभिप्राय जाेडला. कल्पना अंदुरे या 95 टक्के अपंग असल्याचा दाखल जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिला आहे.
11 डिसेंबर 2019 राेजी संजय गांधी समितीला हेतू कार्यालयात मार्फत प्रस्ताव दाखल केला. अंदुरे यांना अनुदान मिळावे, यासाठी कार्यालयात चाैकशी केली, तर प्रस्तावाच आला नसल्याचे सांगण्यात आले. तुम्ही नव्याने प्रस्ताव दाखल करा, असे अंदुरे यांना सांगण्यात आले. पुन्हा प्रस्ताव 13 सप्टेंबर 2022 राेजी सेतू कार्यालयात दाखल केला. सेतू कार्यालयाने 15 सप्टेंर 2022 ला संजय गांधी समिती कार्यालयाला दिला. आता संजय गांधी कार्यालयात पुन्हा प्रस्ताव सापडत नसल्याचे सांगितले गेले.
कार्यालयाने प्रस्ताव खरवंडी येथील तलाठी कार्यालयाला पाठविल्याचे सांगितले. तलाठी कार्यालयाने प्रस्ताव आमच्याकडे नसल्याचे सांगितले. मला अनुदान मिळावे, यासाठी मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा अंदुरे यांनी दिला आहे. लाभार्थ्याचे पती यांनी पंधरा ते वीस वेळा कार्यालयात हेलपाटे मारले. आमदार मोनिका राजळे यांच्या स्वीय सहाय्यकांनी तहसिलदार शाम वाडकर यांना लक्ष घालण्याची विनंती केली. वाडकर यांनी संबधितांना सूचना केल्या.