Pune : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे (वय 56) यांचे आज बुधवारी हृदयविकाराने निधन झाले. अंबादास वाजे यांच्या पश्चात आईवडील, पत्नी, दाेन मुली, मुलगा असा परिवार आहे.
सिन्नर (जि. पुणे) Pune तालुक्यातील डुबरे इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवर प्रभारी केंद्रप्रमुख या पदावर ते कार्यरत हाेते. अंबादास वाजे यांच्या छातीत काल मंगळवारी रात्री साडेदहा वाजता दुखत हाेते. त्यांना उपचारासाठी सिन्नर इथल्या शिवाई हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांची बुधवारी पहाटे तीन वाजता प्राणज्याेत मालवली.
अंबादास वाजे यांच्या निधनाने प्राथमिक राज्य संघाचे आणि शैक्षणिक क्षेत्राचे माेठे नुकसान झाले आहे. शिक्षकांच्या प्रश्नी नेहमीच आक्रमक असलेला नेता आम्ही गमावला आहे. खासगीकरणाविराेधात त्यांचा आवाज नेहमीच बुलंद हाेता. प्राथमिक संघाने मुख्यमंत्र्यांना खासगीकरणाविराेधात निवेदन दिले. त्यात ते आघाडीवर हाेते. अंबादास वाजे यांच्या निधानने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डाेंगर काेसळला आहे. या दुःखातून त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याची शक्ती ईश्वर देवाे.
डाॅ. संजय कळमकर
राज्य नेते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ
अंबादास वाजे हे शिक्षकांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक हाेते. वाजे हे प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी हाेते. त्यांच्या रुपाने उत्तर महाराष्ट्राला पहिला अध्यक्षपद मिळाले हाेते. अंबादास वाजे हे त्यांच्या कार्यत्परतेने सुपरिचित हाेते. शिक्षक, प्रशासन, विद्यार्थी यांच्यामध्ये ते नेहमीच दुवा म्हणून काम करायचे. अत्याधुनिक युगात गुणवत्ता वाढीसाठी तंत्रज्ञानाचा आग्रह धरत असले, तरी ते विद्यार्थी संस्कारासाठी पालक वर्गाशी देखील नाळ जाेडून हाेते.
अंबादास वाजे यांनी पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात नेहमीच समन्वयकाची भूमिका साकारली आहे. आदिवासी हाेतकरू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी दत्तक याेजना सुरू केली आहे. या विद्यार्थ्यांचे पालकत्व त्यांनी स्वीकारले हाेते.