जीवन आनंदी आहे. परंतु काेणताही भराेसा नाही. काेणते संकट कधी येईल, सांगता येत नाही. रस्ता अपघात कधी हाेऊ शकताे. अपघातातील उपचारावर आता लाखाे रुपये लागतात. एवढी माेठी रक्कम भरायची म्हटल्यावर सर्वच आर्थिक नियाेजन बिघडते. अशावेळी विमा महत्त्वाचा ठरताे. परंतु आता महागडा हप्ता भरणे देखील परवडत नाही. अशातच केंद्र सरकाचा प्रधानमंत्री सुरक्षा विमान याेजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) महत्त्वाचा ठरताे.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा याेजना ही केंद्र सरकारने 2015 मध्ये सुरू केला असून, हा विमा याेजना 2 लाखापर्यंत सरंक्षण देताे. याचा लाभ घेण्यासाठी एक जून 2022 पासून 20 रुपये वार्षिक प्रीमियम केले आहे. 1 जून 2022 पूर्वी प्रीमियम फक्त 12 रुपये हाेता. PM Suraksha Bima Yojanaचा उद्देश भारतातील माेठ्या लाेकसंख्येला सुरक्षा प्रदान करणे हा आहे.
(Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) प्रधानमंत्री सुरक्षा विमा याेजनेत सामील झाल्यानंतर 2 लाखापर्यंत विमा संरक्षण दिले जाते. अपघाती मृत्यू झाल्यास अवलंबितांना किंवा कुटुंबियांना दाेन लाख रुपये दिले जातात. कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दाेन लाख, तर आंशिक अपंगत्व आल्यास एक लाख रुपये दिले जातात.
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana चा लाभ घेण्यासाठी वय 18 ते 70 वर्षांदरम्यान असावे. तसेच 70 वर्षानंतर या याेजनेचा लाभ मिळत नाही. प्रीमियमचे पैसे भेट बॅंक खात्यातून डेबिट केले जातात. खात्यात बॅलन्स नसल्यास पाॅलिसी रद्द केली जाते. बॅंक खाते बंद झाल्यास पाॅलिसी लॅप्स हाेते. अनेक बॅंक खाती आल्यास फक्त एक बॅंक खाते याेजनेशी जाेडले जाईल.
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana मध्ये खाते असलेल्या बॅंकेच्या काेणत्याही शाखेत जाऊन तुम्ही PMSBY साठी अर्ज करता येईल. प्रीमियमसाठी तुम्हाला बँक फॉर्मची संमती दिल्यानंतर ती खात्यातून आपाेआप कापली जाते. बँक मित्रही PMSBY योजनेचे घरोघरी जाऊन फायदे मिळवून देत आहेत. विमा एजंटही याचा लाभ मिळवून देऊ शकतात.
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana या अंतर्गत नावनोंदणीचा कालावधी 1 जून ते 31 मेपर्यंत आहे. म्हणजेच तुम्ही या योजनेचे नूतनीकरण मे महिन्यातच करू शकता. योजनेचा कालावधी एक वर्षाचा असून, दरवर्षी त्याचे नूतनीकरण करावे लागते.