Peacock :निसर्गभ्रमंती ग्रुपचे विद्यासागर पेटकर अहमदनगर शहराच्या आसपास असलेल्या जंगलामध्ये येणार्या उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी करावयाच्या उपायोजना संदर्भात फिरत होते. नगर तालुक्यातील केकताई भागात शिकार्यांनी लावलेल्या जाळ्यात त्यांना मोर अडकलेला दिसला. या माेराला शिकारी घेऊन जाताना दिसले.
पटेकर यांनी याची माहिती वन कर्मचारी तेजस झिने व विकास रणसिंग यांना दिली. यानंतर वन कर्मचारी यांनी शिकार्यांचा पाठलाग केल्यावर त्यांनी माेरास साेडून पळ काढला. शिकार्यांच्या जाळ्यात अडकल्याने माेर जखमी झालेला हाेता. पेटकर यांच्यासह वन कर्मचार्यांनी प्राथमिक उपचार करुन मोरास वन संरक्षक अशोक गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या उपचार केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. विद्यासागर पेटकर, प्रसाद खटावकर, संजय दळवी, नितीन केदारी व इतर सदस्य जैवविविधता टिकवण्यासाठी कार्यरत असून यासाठी त्यांना उपवनसंरक्षक सुवर्णा माने, वनपाल मनेष जाधव, वनरक्षक श्रीराम जगताप, वनरक्षक अमोल गोसावी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
