आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानमध्ये विमाने आणि हेलिकॉप्टरसाठी जेट इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे विमानांचे उड्डाण थांबवावे लागले आहे. पाकिस्तानच्या ईधी एअर अॅम्ब्युलन्ससह अनेक कंपन्यांनी त्यांचे काम बंद केले आहे. स्काय विंग्ज एव्हिएशन कंपनीने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.
दरम्यान, ब्रिटनच्या प्रसिद्ध विमान कंपनी व्हर्जिन अटलांटिकने पाकिस्तानातून काढता पाय घेतला आहे. तशी घोषणाच केली आहे. ईधी विमानसेवा बंद झाल्याचा फटका पाकिस्तानातील रुग्णांना सहन करावा लागणार आहे. स्काय विंग्स एव्हिएशन कंपनी वैमानिकांच्या प्रशिक्षणात गुंतलेली आहे. ईधी एअर अॅम्ब्युलन्स सेवा बंद केल्यास गंभीर आजारी रुग्णांचे प्राण वाचविण्याचे काम ठप्प होईल, असे ते म्हणाले.
स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने जेट इंधनाचे लेटर ऑफ क्रेडिट देण्यास नकार दिल्याचा दावा त्यांनी केला. हे इंधन डिसेंबर २०२२ पासून कराची बंदरात अडकले आहे. हे जेट इंधन मिळवण्यासाठी या कंपनीला २३ हजार डॉलर्स द्यावे लागतील आणि त्याची रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे.
पाकिस्तान आर्थिक संकटाच्या दलदलीत अडकत चालला आहे आणि सगळीकडे कर्जाची भीक मागत आहे. पण त्यांना कर्ज मिळवण्यात यश येत नाहीये.
Trending
- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक