कांदा प्रश्नावरून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘जाेपर्यंत निर्यातशुल्क रद्द करत नाही, ताेपर्यंत कांदा उत्पादकांना न्याय मिळणार नाही’, असे सांगत शरद पवार यांनी केंद्रातील माेदी सरकारवर टीका केली आहे.
‘कांदा उत्पादनाचा खर्च करून आम्हाला किंमत द्यावी, अशी शेतकरी मागणी करत आहे. ती किंमत मळत नसल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरावे लागत आहेत. 40 टक्के निर्यातशुल्क अद्यापही रद्द झालेले नाही. निर्यातशुल्क रद्द हाेत नाही, ताेपर्यंत कांदा उत्पादकांना न्याय नाही’, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवार म्हणाले, “जगभर साखर निर्यात करण्याचा विचार सुरू आहे. पण केंद्राने साखरेवर निर्बंध आणण्याचा विचार करत आहे. साखर विदेशात पाठवण्यासाठी काही वेगळी भूमिका केंद्र घेणार असल्याचे दिसत आहे. तसे झाले, तर ऊसाला काेणताही कारखाना चांगला भाव देऊ शकणार नाही.” कष्ट करून ऊस वाढवला आणि दाेन पैसे मिळण्याची स्थिती असताना बंधन घालण्याचे धाेरण राज्यकर्त्यांचे आहे. ते धाेरण काेणाच्याही हिताचे नाही. कष्टकऱ्यांच्या विरोधात पावले टाकली जात आहे, अशी टीका शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केली.
महाराष्ट्रातील दुष्काळावर चिंता व्यक्त करताना सरकारने काय उपाययाेजना करायच्या यावर देखील शरद पवार यांनी भाष्य केले. महाराष्ट्रात काळजीचे चित्र आहे. पाऊस पडलेला नाही. मी कृषीमंत्री असताना दुष्काळ पडला हाेता. ते्हा लाेकांच्या हातांना काम, जनावरांसाठी चारा छावण्या, गावांमध्ये टॅंकरने पाणी देणे, बागायती क्षेत्रातील फळबागांना पाण्यासाठी 25 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला हाेता. असे निर्णय आज का घेतले जात नाहीत, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.