Nagar Political News ः “राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये नागरिकांचा अक्षरशा राजकारणावरचा विश्वास उडाला आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात राजकीय चिखल झाला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना समाजातील विविध प्रश्नांवर काम करत आहे. राजकारणाला समाजकारणाचा जोड असला पाहिजे या संकल्पनेतून राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा हे नेहमीच जनभावनेचे उपक्रम हाती घेऊन राबवीत असतात. त्यानिमित्त मनसे आरोग्य आधार योजनेचा शुभारंभ संपन्न झाला आहे. या माध्यमातून गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत मिळेल त्यांचे समाजाप्रती सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे”, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस अखिल चित्रे यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आरोग्य आधार योजनेचे कार्ड वाटप व मातांचा सन्मान सोहळा झाला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य सरचिटणीस अखिल चित्रे, राज्य सरचिटणीस सायली सोनवणे, उपाध्यक्ष सुमित वर्मा, उपाध्यक्ष संतोष राणे, दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, उत्तर जिल्हाध्यक्ष संकेत लोंढे, तालुका उपाध्यक्ष संकेत जरे, विभाग अध्यक्ष अनिकेत शियाळ, उपशहराध्यक्ष स्वप्निल वाघ , उपशहराध्यक्ष प्रविण गायकवाड, विभाग अध्यक्ष किरण रोकडे,ओंकार काळे , स्वप्निल पिटाला, आयुश नागरे , अमोल भालसिंग, प्रमोद जाधव, प्रमोद ठाकूर, आदिनाथ पुंड , भागवत रोमन ,तेजस भिंगारे , अभिषेक कलमदाणे उपस्थित होते.
सुमित वर्मा म्हणाले, “पक्ष वर्धापनदिनानिमित्ताने विविध उपक्रमांच्या माध्यमातून एक वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला. तीन उपक्रम यंदा वेगळ्यापद्धतीने घेण्यात आले. यात जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करतांना पक्षातील सहकाऱ्यांच्या आईंचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार देखील प्रामुख्याने करण्यात आला. कारण राजकारण म्हटलं की कुटुंबाची वेगळीच मानसिकता असते. पण आपलं पाल्य काय करतेय. कुणासोबत असतंय आपण पाठवतो त्या विश्वासाने काम चालतं का या बाबत एक विचार तयार व्हावा म्हणून मुद्दाम सहकाऱ्यांच्या आईंचा सत्कार करण्यात आला. कारण त्यांनी या सर्व गोष्टींना परवानगी दिली नसती तर एक सहकारी महाराष्ट्र सैनिक घडला नसता”. दुसरे म्हणजे आपण विद्यार्थींसाठी मनसे आरोग्य आधार ही योजना सुरू केली आहे. यातून विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत उपलब्ध होणार आहे. या मध्ये शहरातील हॉस्पिटल, मेडीकल, सिटी स्कॅन सेंटर अशा २० ते २२ ठिकाणी विविध आस्थापनांमध्ये १०% पासून ३०% पर्यंत सुट मिळणार आहे, असे ते म्हणाले.