राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकले आहेत. सकाळपासून सुमारे 100 ठिकाणी पथके छापे टाकले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ISIS व्हिडिओंच्या माध्यमातून तरुणांची भरती करत आहे. नुकतेच एनआयएला अशा अनेक व्हिडिओंची माहिती मिळाली होती. ज्यात तरुणांचे ब्रेनवॉश केले जात आहे. एनआयएचे पथक कोईम्बतूर कार सिलिंडर स्फोट प्रकरणाचाही तपास करत आहे. याबाबत अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
23 ऑक्टोबर 2022 रोजी, तामिळनाडूमधील उक्कडम येथील कोट्टाई ईश्वरन मंदिरासमोर कारमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत जेम्स मुबीन हा संशयित दहशतवादी मारला गेला. या प्रकरणी तपास यंत्रणांनी मुबीनच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली होती. याप्रकरणी 6 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तामिळनाडूतील कोईम्बतूर आणि कर्नाटकातील मंगळुरू येथे गेल्या वर्षी झालेल्या बॉम्बस्फोटांसंदर्भात शोध घेण्यात येत आहे. गेल्या वर्षी 23 ऑक्टोबर आणि 19 नोव्हेंबरला हे बॉम्बस्फोट झाले होते. सूत्रांनी सांगितले की, तामिळनाडूमधील कोडुंगायुर आणि केरळमधील मन्नाडीसह तीन राज्यांतील सुमारे पाच डझन ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले.
एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोईम्बतूर बॉम्बस्फोटाची योजना उमर फारूकने आखली होती. याला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अझरुद्दीन, शेख हिदायतुल्ला आणि सनोफर अली यांचाही या नियोजनात सहभाग होता. प्रेशर कुकरमध्ये ठेवलेला हा बॉम्ब जेम्स मुबीन रिक्षात ठेवून घेत होता. त्यानंतर त्याचा स्फोट झाला. या अपघातात मुबीन आणि एक प्रवासी मोहम्मद शारिक यांचा मृत्यू झाला. तर रिक्षाचालक पुरुषोत्तम पुजारी जखमी झाला.
Trending
- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक