काेराेना संसर्गातून जग सावरले आहे. काेराेनाचा ताे कालावधी आठवला, तरी अनेक स्तब्ध हाेतात. नकाे पुन्हा असे म्हणतात. काेराेना संकटातून बाहेर पडलाे असलाे, तरी आता चीनमधील महिला शास्त्रज्ञांनी जगाला हादरवून साेडणारा दावा केला आहे.
जगात काेराेनासारखीच आणखी एक भीषण महामारी येणार असल्याचा या शास्त्रज्ञाचा दावा आहे. हा दावा चीनच्या वुहान लॅबशी वायराेलाॅजिस्ट शी झेंगली यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या दावाला जगभरातील शास्त्रज्ञांनी गांभीर्याने घेतले आहे.
शी झेंगली आणि वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायराॅलाॅजीच्या शास्त्रज्ञांनी काेराेना विषाणूच्या 40 श्रेणींवर संशाेधन केले आहे. त्यातील निम्म्याहून अधिक अतिधाेकादायक असल्याचे समाेर आले आहे. 20 श्रेणीतील विषाणूंपैकी सहा आधीपासून परिचित आहेत. यामुळे व्यक्ती आजारी पडत असताे. याशिवाय आणखी 3 विषाणू प्राण्यांच्या अनेक प्रजातींमध्ये गंभीर स्वरुपाचा आजार पसरवतात.
शी झेंगली यांच्या पथकातील संशाेधकांनी प्राण्याच्या माध्यमातून माणसापर्यंत पसरणाऱ्या विषाणूंचा अभ्यास केला आहे. हे संशाेधन प्रसिद्ध झाले आहे. काेराेनासारखी महामारीचे कारण ठरू शकरणाऱ्या प्राण्यांचा यात स्पष्ट उल्लेख केला गेलाय.