ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स या राष्ट्रीय संस्थेच्यावतीने शिर्डीत 21 आणि 22 ऑगस्टला राष्ट्रीय पातळीवरील कर परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या टॅक्स कॉन्फरन्समध्ये राज्यातील गुडस अँण्ड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, ऑल गुजरात फेडरेशन ऑफ टॅक्स कन्सल्टंटस, मालाड चेंबर ऑफ कॉमर्स या सारख्या संस्था आणि तिचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या संपूर्ण कॉन्फरन्सचे नियोजन जिल्हयातील ‘अहमदनगर टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन’ यांचे कडून करण्यात येत असल्याची माहिती कॉन्फरन्स चेअरमन विनायक पाटकर यांनी दिली.
दोन दिवस चालणा-या या करपरिषदेमध्ये उपस्थितांना आयकर तसेच जीएसटी विषयांतील नामवंत तज्ञ व अभ्यासू व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार असून, शिर्डी येथील हॉटेल प्रेसिडेंट ईन, रुई – शिव रोड येथे सदरच्या कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कॉन्फरन्ससाठी ऑल इंडिया टॅक्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकजजी घिया आणि त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी उपस्थित राहणार असून, कर परिषदेत जीएसटी विषयांवर चेतन बंब, आसित शाह, अँड. पी. सी. जोशी, संजीवा राव, तर आयकर विषयांवर राहुल हाकानी, मेहुल ठक्कर, के. शिवराम, डॉ. एमकेव्ही मूर्ती यांचे सोबतच, निकिता बधेका, सुजाता रांगणेकर, सी. बी. ठक्कर, जी. वाय. पटवर्धन, पी. व्ही. रवीकुमार, दिपक शहा, राजेश मुनी, मितीश मोदी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या कॉन्फरन्स साठी नावनोंदणी सुरु आहे. राज्याबाहेरील जयपूर, राजस्थान, दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद तसेच राज्यातील मुंबई, ठाणे, नाशीक, रत्नागीरी, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, अहमदनगर, परभणी, धुळे, जळगाव, मालेगाव, अकोला या जिल्हयामधून देखील अनेक कर सल्लागार, सीए तसेच टॅक्स अँडव्होकेटस उपस्थित रहाणार असल्याची माहिती जीएसटीपीएमचे अध्यक्ष प्रवीण शिंदे, नॉर्थ महा असोसिएशनचे अनिल चव्हाण, कॉन्फरन्स सचिव नितीन डोंगरे, अहमदनगर टॅक्स असोसिशनचे अध्यक्ष किशोर गांधी, श्रीपाद बेदरकर, मालाड चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ख्याती वासानी यांनी दिली.
राष्ट्रीय पातळीवरील कर परिषदेचे प्रथमच आयोजन करण्यात येत असून, या परिषदेच्या यशस्विततेसाठी पश्चिम विभागीय संस्थेचे अध्यक्ष आश्विन आचार्य, कॉन्फरन्स चेअरमन विनायक पाटकर, जीएसटीपीएम असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण शिंदे, सचिव विनोद म्हस्के, सुरत येथील मितीश मोदी, नॉर्थ महा असोसिएशनचे अध्यक्ष अनिल चव्हाण, तसेच अहमदनगर टॅक्स प्रैक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष किशोर गांधी, अंबादास गाजुल, सुनील कराळे, आनंद लहामगे, पुरुषोत्तम रोहिडा, प्रसाद किंबणे, सोहनलाल बरमेचा आदी प्रयत्नशील आहेत.