राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घाेषणा झाली आहे. यंदाचे 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या घाेषणेकडे सिनेसृष्टीचे लक्ष लागले हाेते. प्रत्येक कलाकराचे हे एक स्वप्न असते. राष्ट्रीय पुरस्कार काेण पटकवणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले हाेते.
सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा- सरदार उधम, सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा- एकदा काय झालं, सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफी-आरआरआर- तेलुगू, सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- आरआरआर-तेलुगू, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- पुष्पा १, सर्वोत्कृष्ट एडिटर- गंगूबाई काठियावाडी- संजय लिला भन्साली, सर्वोत्कृष्ट संवाद लेखक- गंगूबाई काठियावाडी, सर्वोत्कृष्ट गायिका- श्रेया घोषाल, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स).
याचबराेबर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट ( गंगूबाई काठियावाडी) आणि क्रिती सेनन (मीमी), सर्वोत्कृष्ट अभिनेता- पुष्पा- अल्लू अर्जून, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- निखिल महाजन (गोदावरी), सर्वोत्कृष्ट चित्रपट- ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट.