NAGAR CRIME NEWS : खंडाळा (ता.श्रीरामपूर) येथील अमोल बोरकर यांच्या शेततून एक टन आद्रक चोरील गेले होते. या प्रकरणाचा शोध घेत असताना पोलिसांना आरोपी सापडला खरा, मात्र त्याच्याकडून ३०० किलो आद्रकाबरोबरच तब्बल चोरीच्या १८ दुचाकी व एक पाणबुडी असा १६ लाख रूपयांचा मुद्देमालही हाती लागला. आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून तिघे पसार आहेत. पोलीस उपाधीक्षक डाॅ.बसवराज शिवपुंजे व निरीक्षक नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ऋषीकेश कैलास जाधव (रा.सुतगिरणी फाटा), दिलीप मोहन आढाव (रा.आगाशेनगर), किरण संतोष मोरे (रा.सुतगिरणी, श्रीरामपूर), दानिश मोहम्मद सय्यद (रा.इदगाह मैदान, श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील आढाव हा आद्रक चोरीप्रकरणात असल्याने त्याला जामिन झाला. गौरव बागुल, संदीप सुडगे (दोघे रा. रमानगर, दत्तनगर) व रियाज हुसनीद्दीन शेख (रा.आझादनगर, मालेगाव) हे तिघे पसार आहेत.
११ ते १२ जानेवारीदरम्यान बोरकर यांच्या शेतातील सुमारे १ टन वजनाचे व ६० हजार रूपये किमतीचे तयार आद्रक पिक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात केला. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान निरीक्षक देशमुख यांना सराईत ऋषीकेश जाधव व त्याच्या साथीदारांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाली. १३ फेब्रुवारीला तो त्याच्या घरी सुतगिरणी फाटा येथे आला असता पोलीस पथकाने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने दिलीप आढाव व किरण मोरे यांच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
साथीदारांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून १८ हजार रूपये किमतीचे ३०० किलो आद्रक, ७० हजार रूपये किमतीची दुचाकी व १० हजार रूपये किमतीची पाणबुडी असा ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्य़ात आला.दरम्यान, शहर व परिसरात वेळोवेळी चोरी झालेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता आगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्यांनी श्रीरामपूर शहर, अहमदनगर शहर व इतर ठिकाणाहून दुचाकी व मोपेड चोरल्याची कबुली दिली. गाड्या चोरतांना दानिश सय्यद, गौरव बागुल, संदीप सुड़ते, यांच्यासह मिळून चोरीची कबुली दिली. दानिश हा त्याच्या नातेवाईकांच्या मदतीने गाड्याची विक्री करत असल्याचे सांगितले. दानिशला मालेगाव येथून अटक केली. त्याने मामा रियाज शेख याच्या मदतीने गाड्यांची विक्री करण्यासाठी मालेगाव येथे आल्याची कबुली दिली. त्याच्या मामाच्या घरातून ११ दुचाकी काढून दिल्या.
साहेबांच्या गाडीवरही मारला हात
चोरीला झालेल्या गाड्यांमध्ये पाथर्डीचे तत्कालीन पोलिस निरीक्षकांच्याही गाडीचा सामावेश आहे. संभाजी फरगडे (श्रीरामपूर), अभिषेक वाघ (पाथर्डी), योगेश गायकवाड (श्रीरामपूर), पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण (लातूर), लक्ष्मण साळवे (नेवासे), शामल झावरे (वडगाव गुप्ता), प्रकाश जाधव (ढवळपुरी), अधिक चांडे (फत्त्याबाद), अलीसागर बोहरी (बागलाण), बंडप्पा कुर्ले (नगर), कुलदिप म्हस्के (दत्तनगर), सुहास भोसले (पाथरे), अभिजीत गाडे (बीड), लक्ष्मीकांत माने (राहुरी), ओमकार भालसिंग (पुणे), मोहित लुल्ला (सावेडी) आदींच्या नावावर ह्या दुचाकी आहेत. यातील चार गुन्हे श्रीरामपूर शहर, आठ एमआयडीसी व तीन गुन्हे तोफखाना पोलिसात दाखल आहेत.