Nagar News ः नगर जिल्हा वार्षिक विकास योजनेतून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नातून नागापूर जिल्हा परिषद शाळा आणि रेणुका नगर शाळा येथे डिजिटल शाळा योजनेचा प्रारंभ झाला.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल झाले असून बालवयातच विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचे धडे देणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार डॉ. सुजय विखे यांच्या प्रयत्नातून डिजिटल शाळा योजनेचा प्रारंभ झाला आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये देखील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळणार आहे. नागापूर-बोल्हेगाव परिसरामध्ये औद्योगिक वसाहत असल्यामुळे कामगार वर्ग मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. त्यांच्या मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे मार्गी लावली जात आहे. तसेच त्यांच्या पाल्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी काम सुरू आहे, प्रतिपादन माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे यांनी केले.
उद्योजक बबन कातोरे, बबनराव कातोरे, संजय बोबडे, अण्णा इथापे, लोभाजी कातोरे, चैतन्य बडे, आनंद बडे,,गावडे महाराज,संजय शिंदे, सुरेखा इंगवले, अलका दंडवते, ,कमल करपे, अनिता सप्रे, शिवाजी बेलोटे, किरण बारस्कर, शुभद्रा पालवे यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
महापालिका दवाखाना, गटार लाईन करणे, तसेच विजयनगर हनुमान मंदिर, सभामडंप, बांधकामाचे उद्घाटन झाले. विविध विकासकामे मार्गी लागतील, असे माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे यांनी म्हटले आहे.