लाेकसभा 2024 निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जाेरदार तयारी सुरू आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. निवडणुकांच्या अनुषंगाने वातावरण देशभरात तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज निवडणुकीवर सविस्तर भूमिका मांडली. यात खासदार राऊत यांनी भाजपवर जाेरदार टीका केली. 2024 अगाेदर भाजप पूर्णपणे फुटलेला असेल, असाही दावा राऊत यांनी केला.
संजय राऊत म्हणाले, “एनडीए सनातन धर्मविराेधी असल्याची टीका माेदी करतात. परंतु सनातन धर्माचे कुणीच समूळ उच्चाटन करू शकत नाही. एआयएडीएमके भाजपसाेबत हाेती. पण त्यांचीही भूमिका सनातन धर्मविराेधी आहे. सनातन धर्म जगभरात कायम राहील. माेदींना सनातन धर्माची चिंता करण्याची गरज नाही. भाजपने सनातन धर्माच्या निर्माणाचा आणि संरक्षणाचा ठेका घेतलेला नाही. इथं शिवसेना आहे. त्यासाठी माेदींची गरज नाही”. हा निवडणुकीचा मुद्दा नाही. आत्तापर्यंत तुम्हाला सनातन धर्माची चिंता नव्हती. आता अचानक चिंता वाटायला का लागली. 2024 साठी भाजप व माेदींकडे काहीही मुद्दा नाही. बेराेजगारी, महागाई, चीनची घुसखाेरी, जम्मू-कश्मीर, कॅनडाचे आराेप हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. पण भाजप हे सनातन धर्मावर हाेत आहे, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी आमदार अपात्रता सुनावणीच्या मुद्यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना देखील लक्ष्य केले. विधानसभा अध्यक्षकांवर काेणीही दबाव आणत नाही. हा दबाव ताे सर्वाेच्च न्यायालयाचा आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आम्ही बाेलत आहाेत आणि पाठपुरावा करत आहाेत. विधानसभा अध्यक्षकांनी घटनेचे रक्षण करण्याची शपथ घतेली आहे. मात्र त्यांच्या कारर्किदीत वर्षभरापासून घटनेचा, कायद्याचा खून हाेत आहे. विधिमंडळाच्या काळ्याकुट्ट इतिहासात हे एक पान त्यांच्या नावे लिहिले जाईल, असेही संजय राऊत म्हणाले.