भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे काल अहमदनगर दौऱ्यावर हाेते. भाजपच्या महाविजय 2024 अभियानासाठी त्यांनी सुपर वाॅरियर नियुक्तीवर त्यांनी खासदार, आमदार आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. या संवादात प्रदेशाध्यक्ष बानवकुळे यांनी पदाधिकारी आणि सुपर वाॅरियर यांचे महत्त्व सांगताना कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार राेहित पवार यांना कसे पाडायचे याचे दाखले. चंद्रशेखर बानवकुळे यांनी केलेल्या वारंवार राेहित पवार यांचे नाव घेतल्याने भाजपकडून त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
लाेकसभा निवडणुकीसाठी विधानसभा निहाय सुपर वाॅरियर किती महत्त्वाचे आहे, हे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वारंवार सांगितले. यातच 100 सुपर वाॅरियरच्या अनुपस्थितीवर भाजपचे प्रदेशाध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. सक्षम वाॅरियर नियुक्त करा, अन्यथा उमेदवार पडतील, अशी चिंता देखील प्रदेशाध्यक्षांनी यावेळी व्यक्त केली.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे आमदार राेहित पवार (शरद पवार गट) यांना पाडायचे असेल, तर तुम्हाला त्या विधानसभा क्षेत्रात 100 सुपर वाॅरियर म्हणून सक्षम कार्यकर्तेच नेहमी लागतील. सनातन हिंदू धर्म संपवण्याचे भाष्य उदयनिधी स्टॅलिन यांनी केले. उदयनिधी व राेहित पवार यांचे एकत्रित छायाचित्र जनतेला दाखवा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे उदयनिधीला इंडिया आघाडीत घेतात, हे सर्व जनेतपर्यंत पाेहचवा, असे सांगितले.
सुपर वाॅरियर कार्यकर्त्या मेळाव्याला आणायचे आहे, याची माहिती नव्हती. तसेच सुपर वाॅरियर हवेत की, सुपरमॅन पाहिजेत, असे श्रीगाेंद्याचे विधानसभा प्रमुख बाळासाहेब महाडिक यांनी विचारल्यावर कार्यकर्त्यांमध्ये हसू पसरले. सुपर वाॅरियर हा राजकीय कलाकार पाहिजे. ताे सक्षमच हवा. जिल्हा परिषद, पंचयात समिती सदस्य, आजी-माजी नगरसेवक ताे असायला हवा, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.