Close Menu
Kharee GoshtKharee Gosht
    What's Hot

    Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…

    May 4, 2024

    Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड

    May 4, 2024

    Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा

    May 4, 2024
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
    • Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
    • Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
    • Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
    • Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
    • Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
    • Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
    • Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
    Kharee GoshtKharee Gosht
    Wednesday, July 9
    • Home
    • खरी गोष्ट
    • ताज्या बातम्या
    • महाराष्ट्र
    • शैक्षणिक
    • अर्थ
    • मनोरंजन
    Kharee GoshtKharee Gosht
    Home»शैक्षणिक

    मंत्री विखेंची महाविद्यालयातील सेतू सुविधा केंद्राबाबत माेठी घाेषणा 

    Kharee GoshtBy Kharee GoshtSeptember 20, 2023 शैक्षणिक No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook WhatsApp Twitter LinkedIn Pinterest Email

    महसूल विभागाच्यावतीने संगमनेर महाविद्यालयात आयोजित ‘युवा ही दुवा’ या राज्यस्तरीय उपक्रमाचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरू करणार असल्याचे महसूलमंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

    मंत्री विखे पाटील म्हणाले, “आजचा युवक उपक्रमशील आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या बदलत्या गोष्टी तो जलदपणे आत्मसात करतो. युवकांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी यापुढे प्रत्येक महाविद्यालयात सेतू सुविधा केंद्र चालविण्याचे धोरण आणण्यात येईल”. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलता वाव देण्याबरोबरच त्यांना कमवा व शिकाच्या माध्यमातून शिक्षण घेण्याची सोय व्हावी. यासाठी महाविद्यालय, दिव्यांग, एकल महिलांना यापुढे सेतू केंद्र देण्याचे शासनाने धोरण आहे. प्रत्येक वर्षी 1 ऑगस्टला महसूल दिन साजरा केला जातो.‌ या वर्षी महसूल दिनी महसूल सप्ताह साजरा करण्यात आला. यात ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ ह्या स्तुत्य उपक्रमात हजारो प्रकरणे निकाली काढून राज्यात हजारो सैनिकांना न्याय देण्यात आला. तसेच महसूल सप्ताहातच समाजाच्या उन्नतीसाठी ‘युवा ही दुवा’ हा उपक्रम राबविण्यात आला. ‘युवा‌ ही दुवा’ हा स्तुत्य उपक्रमात यशस्वी सहभाग घेतल्याने विद्यार्थ्यांची उपक्रमशीलता दिसून आली. महसूली आणि इतर शासकीय सेवा ऑनलाईन देण्यात महाराष्ट्र राज्य वर्षभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य होणार आहे, असेही मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

    जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी महसूल सप्ताहात युवा संवाद आयोजित करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यात 107 महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. जिल्ह्यातील 38 महाविद्यालयांसोबत मतदार जागृती करण्याचे काम करण्यात येत आहे. शासनाचे विभाग आता कालानुरूप तंत्रज्ञानस्नेही होत आहेत‌. ऑनलाईन सेवा देण्याचे काम करत आहेत. शासनाप्रती संवेदना निर्माण करण्याचे काम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा योजनांचा प्रचार-प्रसार करण्यात येईल, असे सांगितले.

    संजय मालपाणी यांनी युवकांचा समाजाशी संवाद होणे गरजेचे आहे. महसूल खाते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या घराघरापर्यंत पोहचणार आहे, असे सांगितले. प्रशिक्षण पूर्ण केलेली विद्यार्थ्यांनी सायली मांडे हिने ही यावेळी आपले मत व्यक्त केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते सायली मांडे, प्रमोद गांजवे, ऋत्विक खासे, संदीप गोसावी, यशवर्धन कासार, श्रेयस मांडेकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

    उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांनी प्रास्ताविक केले. शिर्डी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, प्राचार्य डॉ.अरूण गायकवाड, संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे आदी यावेळी उपस्थित होते.तहसीलदार धीरज मांजरे यांनी आभार मानले.

    ‘युवा ही दुवा‌’ उपक्रम
    संगमनेरमधील जवळपास 16 महाविद्यालयांशी समझोता करार करून महसूल विभागाच्या योजनांचा प्रसार करण्यात आला. यामध्ये ई-हक्क प्रणाली, ई-पीक पाहणी,‌ ई-चावडी नागरी पोर्टल, ऑनलाईन जमीन महसूल, लक्ष्मी मुक्ती योजना, घरबसल्या ऑनलाईन दाखले, मतदार नोंदणी, सलोखा योजनांचा प्रचार-प्रसार करण्यात आला. यासाठी प्रत्येक महाविद्यालयातून 20 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यांना क्रेडिट गुण ही देण्यात आले. या माध्यमातून महसूल विभागाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे.

    Share. Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kharee Gosht

      Keep Reading

      Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य

      Sport in Ahmednagar ः जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत 300 खेळाडूंचा सहभाग

      New Arts College News ः प्राचार्य झावरे व प्रा. जावळे यांचा सेवापूर्ती गौरव

      Employment News ः रसायनशास्त्र विभागातील 20 विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

      Rahuri News ः सावित्रीच्या लेकी क्रिकेटमध्ये राज्यात प्रथम

      Bhingar News ः पूजा वराडे व तुषार घाडगे यांचा गौरव

      Add A Comment
      Leave A Reply Cancel Reply

      Editors Picks

      Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…

      May 4, 2024

      Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड

      May 4, 2024

      Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा

      May 4, 2024

      Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले

      May 4, 2024
      Latest Posts
      © 2025 Kharee Gosht
      • Privacy Policy
      • Terms
      • Accessibility

      Type above and press Enter to search. Press Esc to cancel.