महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर विखारी टीका केली आहे. “संजय राऊत हा सर्वात माेठा दलाल आहे. मुंबईतल्या पत्राचाळ घाेटाळ्यात मराठी माणसाची फसवणूक करून काेट्यवधींची माया गाेळी केली. काेविडच्या काळात लाेक मृत्यूशी झुंजत हाेते, मात्र मेलेल्यांच्या टाळूवरचं लाेणी खाण्यात ज्याने धन्यता मानली, ताे संजय राऊत आहे”, अशी टीका मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.
मंत्री विखे पाटील म्हणाले, “माधव गडकरी हे ज्येष्ठ संपादक हाेते, ते आज हवे हाेते. त्यांनी संजय राऊतचे कर्तृ्व कसे आहे, हे सांगितले असते. आपल्याविराेधात लाेकांनी ओरड करू नये आणि तक्रार करू नये म्हणून मुंबई उच्च न्यायालयात एका महिलेसंबंधीचे प्रकरण सुरू आहे. असे लाेक माझ्यावर जर आराेप करत असतील, तर मला काही फरक पडत नाही. आयुष्यभर ज्यांनी दलाली केली त्यांनी दुसऱ्यावर कशाला बाेलायचे? अशा लाेकांच्या वक्तव्याला प्रसिद्धी मिळते, हेच आश्चर्यकारक आहे”. माझ्या बदनामीचे षडयंत्र आहे, असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.
खासदार संजय राऊथ यांनी मंत्री विखे पाटील यांच्यावर साखर कारखाना प्रकरणात आराेप केले हाेते. त्याबाबत विचारले असता, ‘खासदार राऊत हा सर्वात माेठा दलाल आहे, त्याने आयुष्यभर दलालीच केली’, अशी विखारी टीका मंत्री विखे पाटील यांनी केली. त्याच्या टीकेला कुठेही महत्त्व देत नाही, असेही मंत्री विखे पाटील म्हणाले.