राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. ओबीसी आरक्षण व त्यातून मागणी हाेत असल्याने हा आरक्षण राज्यकर्त्यांची डोकेदुखी ठरत आहे. यातच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा तापू लागला आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साेलापूर दाैऱ्यावर असताना धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांच्यावर भंडारा टाकण्यात आला. यावरून धनगर आरक्षणाचा मुद्दा नव्याने पेटण्याची शक्यता आहे. यावर मंत्री विखे पाटील यांनी प्रतिक्रिया ‘एक्स’वर प्रतिक्रिया दिली आहे.
पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंदच…
भंडारा उधळणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नको.
धनगर आरक्षणा संदर्भातील कृती समितीच्या भावनांबद्दल सरकार संवेदनशील!— Radhakrishna Vikhe Patil (@RVikhePatil) September 8, 2023
मंत्री विखे पाटील यांनी एक्सवर भंडारा टाकण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंदच… भंडारा उधळणाऱ्यांवर काेणतीही कारवाई नकाे. धनगर आरक्षण संदर्भातील कृती समितीच्या भावनांबद्दल सरकार संवेदनशील”!
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे साेलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. मंत्री विखे पाटील दाैऱ्यावर असताना ते शासकीय विश्रामगृहावर थांबले हाेते. त्यावेळी धनगर कृती समितीचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी आले. मंत्री विखे पाटील यांनी देखील संबंधित शिष्टमंडळाला भेटीसाठी बाेलावलं. धनगर कृती समितीतील पदाधिकारी बंगाळे यांनी एक निवेदन दिले. मंत्री विखे पाटील हे निवेदन पाहत असताना खिशातून एक पुडी काढून मंत्री विखे पाटील यांच्या डाेक्यावर भंडारा ओतला. अचानक हा प्रकार झाल्याने नेमके काय घडले यावरून गाेंधळ उडाला. मंत्री विखे पाटील यांचे अंगरक्षक सावध झाले आणि बंगाळे याला पकडला. मंत्री विखे पाटील यांच्याबराेबर काही कार्यकर्ते हाेते. त्याने भंडारा टाकणाऱ्याला चाेप दिला. पाेलिसांनी बंगाळे याला ताब्यात घेतले आहे.
बंगाळे यांनी प्रसारमाध्यमांसमाेर प्रतिक्रिया दिली. “धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने घटनादत्त एसटी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरीत करावी. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावू नये यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे”. धनगर आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर झाली नाही, तर येणाऱ्या काळात मुख्यमंत्री, मंत्र्यांना काळं फासायलाही धनगर समाज मागे-पुढे बघणार नाही, असा इशारा बंगाळे यांनी दिला.
मंत्री विखे पाटील यांच्यावर ज्याप्रमाणे भंडारा टाकण्यात आला. तसाच 2014 मध्ये विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना त्यांच्यावरही बंगाळे यांनी अशाच प्रकारे भंडारा टाकला हाेता.