Crime News ः नगरच्या एमआयडीसी परिसरात आरडाओरडा करून हातात घेऊन दहशत निर्माण करत असलेल्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे. करण सुंदर शिंदे (रा. शिवाजीनगर, एमआयडीसी, नगर) आणि विशाल दिपक कापरे (रा. चेतना कॉलनी, नवनागापूर, नगर) असे अटक केलेल्यांची नावे असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली.
नगर-मनमाड रस्त्यालगत नवनागापूर येथील हाॅटेल राज रेजन्सीजवळ हातात लोखंडी धारदार कोयता घेऊन दोघे मोठमोठ्याने आरडाओरड करत दहशत निर्माण करत आहेत. त्यावरून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक पथक तयार करून सदर ठिकाणी जाऊन या दोघांना ताब्यात घेण्यात आले. करण सुंदर शिंदे आणि विशाल दिपक कापरे, अशी त्यांनी त्यांचे नावे सांगितले.
या दोघांविरोधात पोलीस कर्मचारी सचिन नागरे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील करण शिंदे यांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार गु्न्हे दाखल आहेत. विशाल दिपक कापरे याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन, भिंगार पोलीस ठाण्यात एक असे चार गुन्हे दाखल आहेत. उपनिरीक्षक मनोज मोंढे, पोलीस कर्मचारी नंदकिशोर सांगळे, गणेश चौधरी, राजेंद्र सुद्रिक, सुनील आव्हाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.