March for Renaming of Ahmednagar अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा जाेर वाढला आहे. अहमदनगर जिल्ह्याचे पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकरनगर नामकरणासाठी कृती समितीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा नेला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टमेकाेडवली येथील नारायण खाणू माेठे देसाई, कृती समितीचे विजय तमनकर, राजेंद्र तागड, काका शेळके, निशांत दातीर, विनाेद पाचारणे, वकील अक्षय भांड, ज्ञानेश्वर बाचकर, शारदा ढवण, दत्ता खेडेकर, अण्णासाहेब बाचकर, अशाेक वीरकर, डी. आर. शेंडगे, बाबासाहेब तागड, सचिन डफल, राजेंद्र पाचे आदी माेर्चात हाेते. अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराची मागणी आमदार गाेपीचंद पडळकर, आमदार राम शिंदे, माजी मंत्री महादेव जानकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केली हाेती. राज्याचे मंत्री दीपक केसकर यांनी या मागणीला उत्तर दिले हाेते. जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव आल्यावर सरकार या नावासाठी अनुकूल असल्याचे सांगितले हाेते. राज्य सरकारने प्रशासनाला पत्र पाठवून प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना केल्या हाेत्या. मात्र अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रस्ताव पुढे पाठवण्यात आला नाही. यासाठी नामांतर कृती समितीच्यावतीने ९ फेब्रुवारीला पुण्याश्लाेक अहिल्यादेवी जन्मगाव चाैंडी येथून नामांतर रथयात्रा सुरू केली. या रथयात्रेला १४ तालुक्यांमधील अनेक ग्रामपंचायतीचे ठराव, नगरपालिका ठराव, सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळाला.
यानुसार अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला आज देण्यात आले. आंदाेलकांमधील भक्ती तमनर, आदिती पाचारणे, शाेभा दातीर, श्रृतिका तमनर, पुजा ढवण, दिव्या ढवण यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
