‘ओपनहायमर’ चित्रपटाची जाेरदार चर्चा आहे. 21 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याने पहिल्या तीन दिवसांत 50 काेटींवर कमाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ख्रिस्ताेफर नाेलन यांनी केले आहे. अणुबाॅम्बचे जनक अमेरिकन भाैतिकशास्त्रज्ञ ज्युलियस राॅबर्ट यांच्यावर हा चित्रपट आहे. मात्र या चित्रपटातील काही दृश्यांवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘फॅंड्री’ फेम शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने यावर पाेस्ट शेअर करत हिंदूंचा अपमान करणाऱ्या या चित्रपटाचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे.
‘ओपनहायमर’ चित्रपटाविषयी राजेश्वरी खरात हिने फेसबुकवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “हिंदू-मुस्लिम, धर्म, जात-पात, रंग इत्यादी विषयांमध्ये लाेक एकत्रित येऊन दंगे माेर्चे आणि काय काय करतात. पण या गाेष्टींमुळे आपण आपल्याच देशातील लाेकांचा द्वेष करत आलाेय. आज बाहेर देशातील काही लाेकांनी आपल्या धार्मिकतेचा अपमान केला आहे. यावर काेणी जास्त काही बाेलेनात. सर्वांना विनंती आहे की, या प्रकरणाचा तीव्र निषेध करा आणि या सिनेमाचा याेग्य ताे निर्णय लागावा ही जबाबदारी सरकारने लवकरात लवकर घ्यावी”, असे तिने पाेस्टमध्ये म्हटले आहे.
‘ओपनहायमर’ यांनी हिंदू धर्मातील वेद आणि भगवद्गगीतेचा प्रचंड अभ्यास केला हाेता. त्यासाठी त्यांनी संस्कृत भाषा शिकून घेतली हाेती. याचा चित्रपटात दाेन ठिकाणी उल्लेख येताे. या चित्रपटात मुख्य भूमिका निभावणारा सिलियम मर्फी आणि चित्रपटातील अभिनेत्री यांच्यात चित्रित झालेले सेक्स सीनदरम्यान सिलियन मर्फी म्हणजेच ‘ओपनहायमर’ हे भगवद्गगीतेचे वाचन करताना दिसत आहे.
या सीनमध्ये अभिनेत्री टाॅपलेस आणि तिने समाेर भगवद्गगीता धरली आहे. अभिनेता सिलियम मर्फी त्यातील श्लाेकाचा अर्थ तिला सांगताना सेक्स करत आहेत. अशाप्रकारे हे दृश्य चित्रीत झाले आहे. तसे ते चित्रपटात देखील दाखविण्यात आले आहे. या दृश्याला अनेकांनी ट्विट करत विराेध आणि आक्षेप घेतला आहे.