मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना इथल्या अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदाेलनकर्त्यांवर अमानुष लाठीहल्ला झाला. या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या शेकडो महिला-पुरुषांवर लाठीहल्ल्यानंतर गोळीबार आणि अश्रूधूर करत हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. राज्य सरकारच्या या दडपशाहीचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निषेध नोंदविला आहे.
या निषेधासाठी भाकपच्या अहमदनगरमधील नेत्यांशी अंतरावाली सारटी गाठली. उपाेषणाला बसलेले मनाेज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आंदाेलनाला पाठिंबा दिला. यावेळी पक्षाचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे, राज्य सहसचिव प्रा. राम बाहेती, राज्य सचिव मंडळ सदस्य नामदेव चव्हाण, राजन क्षीरसागर, राज्य कौंन्सिल सदस्य संजय नांगरे, उस्मानाबाद जिल्हा सचिव उपसरपंच पंकज चव्हाण, बीड जिल्हा सचिव भाऊराव प्रभाळे, ज्योतीराम हुरकुडे, नितीन रांजवन, अंगद ढाकणे, जालना जिल्हा सचिव प्रल्हाद पडूळ, देविदास जिगे, शेवगाव तालुका सचिव संदीप इथापे, वैभव शिंदे, रजत लांडे, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष प्रसाद गोरे, शेतमजुर युनियनचे औरंगाबाद जिल्हा सचिव गणेश कसबे यांच्यासह राज्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने मराठा समाज आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. तसेच राज्य सरकारच्या दडपशाहीचा निषेध करत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.