सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आता आपला माेर्चा बाॅलिवूड अभिनेत्यांकडे वळवलाय. सट्टा अॅपची जाहिरात केल्याप्रकरणी रणबीरला समन्स बजावले आहे. याचप्रकरणी कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेत्री हुमा कुरेशी यांना दाेघांनीही ‘ईडी’ने समन्स बजावले आहे. ‘ईडी’ने ही समन्स बजावल्याने बाॅलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.
महादेव ऑनलाईन सट्ट्याचे अॅप आहे. रणबीर कपूरने याची जाहिरात केली हाेती. याप्रकरणी ‘ईडी’ने रणबीरला समन्स बजावले आहे. यावर रणबीर याने म्हणणे मांडण्यासाठी दाेन आठवड्यांची वेळ मागितली आहे. रणबीर सहा ऑक्टाेबरला चाैकशीसाठी बाेलवण्यात आले हाेते. या अॅप संदर्भात पूर्वी काही बॉलिवूड अभिनेता आणि अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली आहे.
सनी लिओनी, भाग्यश्री, टायगर श्रॉफ यांचीही चौकशी झालीय. आता रणबीरपर्यंत हे धागेदोरे पाेहेचले आहेत. आता रणबीर कपूरच्या मागणीवर ‘ईडी’ काय उत्तर देतं, याकडे लक्ष लागलंय. तसेच आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, अली असगर, विशाल ददलानी, टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, भारती सिंग, एली अवराम, पलकित सम्राट, कीर्ती खरबंदा, नुसरत भरूचा आणि कृष्णा, असे अनेक सेलिब्रिटी ‘ईडी’च्या रडारवर आले आहेत.
महादेव हे ऑनलाईन सट्ट्याचे अॅप आहे. या अॅपच्या जाहिरातीमुळे रणबीरसह अनेक स्टार्स ‘ईडी’च्या निशाण्यावर आलेत. फेब्रुवारीमध्ये यूएईमधल्या अलिशान हॉटेलात ऑनलाईन सट्टा अॅपप्रकरणातील आरोपी सौरभ चंद्राकरचा लग्न सोहळा झाला. या सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे रणबीरसह अनेक कलाकार ‘ईडी’च्या रडारवर आलेत. त्यामुळे हे प्रकरण केवळ ऑनलाईन सट्ट्यापुरतं मर्यादित नाही, असा संशय ‘ईडी’ला आहे.