Close Menu
Kharee GoshtKharee Gosht
    What's Hot

    Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…

    May 4, 2024

    Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड

    May 4, 2024

    Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा

    May 4, 2024
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
    • Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
    • Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
    • Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
    • Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
    • Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
    • Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
    • Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
    Kharee GoshtKharee Gosht
    Tuesday, July 1
    • Home
    • खरी गोष्ट
    • ताज्या बातम्या
    • महाराष्ट्र
    • शैक्षणिक
    • अर्थ
    • मनोरंजन
    Kharee GoshtKharee Gosht
    Home»ताज्या बातम्या

    Mahavitran News ः मान्सूनपूर्व कामांना महावितरणची सुरुवात

    Kharee GoshtBy Kharee GoshtApril 30, 2024 ताज्या बातम्या No Comments3 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook WhatsApp Twitter LinkedIn Pinterest Email

    Pre-monsoon planning by Mahavidaran ः महावितरणकडून मान्सूनपूर्व आगमना अगोदर विद्युत यंत्रणेची देखभाल व दुरूस्तीची कामे सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यासह विद्युत वाहिन्या व यंत्रणेची देखभाल दुरूस्ती यासह नियोजन करून इतर महत्वाची कामे केली जातात. जेणेकरून पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही. नाशिक परिमंडलात अभियंते, जनमित्र व बाह्यस्त्रोत कामगारांच्या माध्यमातून ही कामे सुरू झाली असून त्यामुळे ग्राहकांची तात्पुरती गैरसोय होत असली तरी पावसाळ्यामध्ये ग्राहकांना अखंडीत वीज मिळावी म्हणूनच ही कामे केली जातात. तरी ग्राहकांनी संयम राखून या काळात सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

    महावितरणची विद्युत यंत्रणा उघड्यावर असल्याने अनेक कारणांमुळे यंत्रणेमध्ये व्यत्यय येत असतो त्यासाठी कुठलाही वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरण चे कर्मचारी सातत्याने कार्यरत असतात. परंतु विद्युत यंत्रणांच्या देखभाल व दुरूस्तीचे काम करायचे असल्यास सदर कार्य करण्यासाठी त्या भागातील वीजपुरवठा खंडित करावाच लागतोच, त्यामध्ये सर्व भागच वा विद्युत वाहिनी खंडित न करता टप्प्या टप्प्याने कामे करून तेवढाच भाग खंडित करून त्या भागातील दुरूस्ती व देखभालीची कामे केली जातात. ही कामे पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊन जास्त वेळ वीज पुरवठा बंद राहू नये म्हणून उंच वाढत असलेल्या झाडाच्या फांद्या विद्युत यंत्रणेला स्पर्श करीत असेल तर त्या फांद्या तोडणे, फुटलेले पीन आणि इंसुलेटर बदलणे, तपासणी व दुरूस्त करणे, रोहित्रांचे ऑईल तपासणी, ऑइल गळती थांबवणे, वाहिनींचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे, भूमिगत वाहनांचे तात्पुरती असलेले जॉईट कायमस्वरूपी करणे, वाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदली, जीर्ण झालेल्या वायर बदल, जळालेल्या तुटलेल्या वायर बदल, उपकेंद्रातील सर्व यांत्रिक बाबीची व यंत्रणा यांची तपासणी करणे व त्याची दुरुस्ती करणे तसेच प्रत्यक्ष वेळेवर आणि संबंधित ठिकाणी आढळणाऱ्या त्रुटी दूर करून अशा प्रकारची अनेक कामे गतीने केली जातात. मात्र सदर कामे करीत असताना काही काळासाठी वीजपुरवठा खंडित केला जातो.

    महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी अहमदनगर मंडळातील सर्व अभियंते व कर्मचारी यांना उपाययोजना व सुरक्षितता बाळगून ही कामे योग्य ती काळजी घेऊन गतीने करण्याबाबत निर्देशित केले आहे. त्यानुषंगाने ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा म्हणून हे पावसाळ्यामध्ये यंत्रणा ठप्प न होता अखंडीत पुरवठा व्हावा आणि त्यामुळे ग्राहकांना या प्रादुर्भावामध्ये घरबसल्या योग्य सेवा मिळावी म्हणून ही कामे करत असतात. सोबतच ही कामे करण्याअगोदर ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएस द्वारे सुद्धा यासंदर्भात पूर्वसूचना दिली जाते आणि ही कामे योग्य प्रमाणात विभाजन करून त्या प्रकारे एक एक भाग बंद करून ही कामे केली जातात. ही कामे केल्यानंतर सुद्धा अनेक वेळा जोरदार वादळी वारा व पावसामुळे झाडे, फांद्या पडून तारेवरील डिक्स इंसुलेटर वर आकाशातील वीज पडून तसेच तांत्रिक दोषामुळे यंत्रणेचे नुकसान होत असते त्यामुळे त्यानंतरसुद्धा महावितरणची यंत्रणा पूर्ववत व सुरळीत करण्यासाठी कार्य केल्या जाते. मात्र अगोदर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे गतीने वीज पुरवठा सुरळीत करण्यास मदत होते. त्यामुळे घरी असलेले सर्वच नागरिक, वाढत्या तापमानामूळे ग्राहकांना विजेअभावी होणाऱ्या त्रासाची महावितरणला जाणीव आहे. देखभाल दुरुस्तीची कामे वीज यंत्रणेच्या हिताची तसेच अखंडित, सुरळीत व सुरक्षित ग्राहक सेवेसाठी असून तरी ग्राहकांनी या काळात थोडासा संयम राखून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

    Share. Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kharee Gosht

      Keep Reading

      Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा

      Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…

      Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक

      Ahmednagar Police News ः सावेडीत सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ

      Sport in Ahmednagar ः शिवाजीयन्स संघ चॅम्पियन

      Maharashtra Osteopathy Association Day ः सांधे आणि हाडांच्या आरोग्यावर मोफत तपासणी

      Add A Comment
      Leave A Reply Cancel Reply

      Editors Picks

      Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…

      May 4, 2024

      Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड

      May 4, 2024

      Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा

      May 4, 2024

      Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले

      May 4, 2024
      Latest Posts
      © 2025 Kharee Gosht
      • Privacy Policy
      • Terms
      • Accessibility

      Type above and press Enter to search. Press Esc to cancel.