Mahavitaran महावितरण कंपनी काेराेनानंतर त्यांच्या कारभारात अधिक वेगाने सुधारणा करताना दिसत आहे. वीज ग्राहकांना डिजिटल वीजबिलांसह विविध उपक्रम त्यांचे यशस्वी हाेत आहेत. यातच आता महावितरणने वीजबिले अतिशय अचूक पद्धतीने ग्राहकांना मिळावित यासाठी महावितरणने माेहिम सुरू केली हाेती. आता या माेहिमेला देखील यश मिळू लागले आहे. गेल्या सहा महिन्यात विजेच्या मीटरच्या अस्पष्ट छायाचित्रांचे प्रमाण दाेन टक्क्यांपेक्षाही कमी झाले आहे. जानेवारीत हे प्रमाण दीड टक्क्यांपर्यंत खाली आले. यामुळे ग्राहकांच्या तक्रारी कमी झाल्याची माहिती महावितरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.
वीज ग्राहकांना वीज बिल देण्याअगाेदर वीज मीटरचे छायाचित्र घेतले हाेते. ते वीज बिलावर वापरले जाते. त्यातून वीजवापराच्या आकडेवारीची नाेंद घेतली जाते. मीटरमध्ये काही दाेष असेल किंवा घर बंद असल्यास अनेक अडचणी येतात. याशिवाय मीटर रिडिंग करता येत नाही. मीटरचे छायाचित्र अस्पष्ट येते. त्यातून सरासरी बिले दिली जातात. यातून तक्रारी सुरू हाेतात. हे टाळण्यासाठी महावितरणने मीटरचे छायाचित्र अधिक स्पष्ट देण्याची माेहिम सुरू केली. या माेहिमेला आता यश येताना दिसत आहे. या माेहिमेला यश येताना दिसत असल्याने महावितरणच्या महसुलातही वाढ हाेताना दिसत आहे.
मीटरचे घेतलेले छायाचित्र वीज बिलावर अस्पष्ट असल्याच्या प्रमाण ४६ टक्के हाेते. ते आता खूप कमी गेले आहे. महावितरणचे कर्मचारी यासाठी मेहनत घेताना दिसत आहे. परिणाम माेहिमेला यश येत आहे. गोंदिया, कोकण, कोल्हापूर, नागपूर, कल्याण व भांडूप या परिमंडलात वीज मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाण प्रत्येकी एक टक्क्यांच्याही खाली गेले आहे. अमरावती, जळगाव, पुणे, बारामती व नांदेड या परिमंडलांमध्ये वीज मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाणे एक ते दोन टक्के आहे. राज्यातील जानेवारी महिन्यात दीड टक्के प्रमाण आहे. वीज ग्राहकांना अचूक वीजबिले मिळावीत व त्यांच्या बिलांमध्ये काही तक्रार राहू नये यासाठी महावितरण प्रयत्न करत आहे.
