उद्धव ठाकरे यांच्याबराेबरच शरद पवार यांच्या देखील सभांचे सत्र सुरू आहेत. शरद पवार यांची सभा आज शुक्रवारी काेल्हापूर इथं हाेत आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे यांची रविवारी (ता. 27) सभा हिंगाेलीत हाेत आहे. ठाकरे गटाकडून या सभेची जाेरदार तयारी सुरू आहे. परंतु या सभेवरून ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकरर्ते समाेरासमाेर आले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या अयाेध्या पाैळ पाटील यांनी शिंदे गटाचे आमदार संताेष बांगर यांच्यावर नाव घेता ‘गद्दार दादुल्या’ म्हणत सडकून टीका केली आहे. अयाेध्या पाैळ पाटील यांनी पकडलेला ‘गद्दार दादुल्या’ हा शब्द ट्रेडिंगमध्ये आहे. तसेच अयाेध्या पाैळ पाटील यांनी सभेचा टीझर देखील लाॅंच केला आहे.
"जमलेल्या माझ्या तमाम……."
तारीख : 27 ऑगस्ट 2023, स्थळ : रामलीला मैदान हिंगोली.#UddhavThackeray ❤️🔥💪🚩@OfficeofUT .@AUThackeray @iambadasdanve @AhirsachinAhir @ianildesai @RavindraWaikar @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @SardesaiVarun @DeshmukhSB24 @TV9Marathi… pic.twitter.com/5Sx2LN2UgW
— Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) August 24, 2023
अयाेध्या पाैळ पाटील म्हणाल्या, “कळमनुरी विधानसभेचा गद्दार व त्याचे चेलेचपाटे त्यांनी लावलेले बॅनर्सचे व्हिडिओ मला पाठवत आहेत. गद्दारांसह सर्व चिरकुटांना मी सांगू इच्छिते की, मार्केटिंग व बॅनरबाजीची गरज तुम्हाला आहे. कारण जाे बापमाणू हिंगाेलीत येताेय, ताे तळपता सूर्य आहे, एक ब्रॅंड आहे. त्यांनी मार्केटिंग व बॅनरबाजीची गरज नाही”. उद्धव ठाकरे या 24 कॅरेट अस्सल ब्रॅंडचे मार्केट डाऊन करण्यासाठी स्वयंघाेषित जागतिक स्तराची महाशक्ती अपयशी ठरत आहे. तिथे तू तुझी अगरबत्ती कुठे लावताे ‘गद्दार दादुड्या’? हिंगाेलीत स्वयंघाेषित महाशक्तीचा बाप येताेय बाप, असे म्हणत अयाेध्या पाैळ पाटील यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली.
कळमनुरी विधानसभेचा #गद्दार व त्याचे चेलेचपाटे मला त्यांनी लावलेल्या बॅनर्सचे व्हिडिओ पाठवत आहेत तर गद्दार सहीत सर्व चिरकुटांना सांगू इच्छिते की मार्केटिंग व बॅनरबाजीची गरज तुम्हालाच आहे कारण जो #बापमाणूस हिंगोलीत येतोय तो तळपता सुर्य आहे, एक ब्रॅंड आहे ज्याला मार्केटिंग व…
— Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) August 24, 2023
‘अयाेध्या पाैळ पाटील यांनी संताेष बांगर यांना एक आठवण करून दिली आहे. ‘मिशा कधी काढणार?”, असा खाेचक सवाल त्यांनी केला आहे. संताेष बांगर यांनी अयाेध्या पाेळ यांना जाहीर आव्हान दिले हाेते. अयोध्या पाेळ यांनी संजय बांगर यांचा उल्लेख ‘गद्दार’, असा केला आहे.
आपण शिवसैनिक आहाेत. जत आपल्याला काेणी गद्दार म्हणत असेल, तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचे काम माझ्या शिवसैनिकांनी करावे. आम्ही घाबरणारे शिवसैनिक नाहीत. आमच्या हातामध्ये बांगड्या नाहीत. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहाेत. आम्हाला जर काेणी आरे म्हटले, तर त्याला कारे नाही, पण कानाखाली आवाज काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संताेष बांगर यांनी दिला हाेता. यातच अयाेध्या पाैळ पाटील यांनी त्यांना ‘गद्दार दादुड्या’ म्हटल्या आहेत. त्यामुळे संताेष बांगर आणि त्यांचे कार्यकर्ते काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागले आहेत.