मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या 12 आमदारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी माताेश्रीवर फाेन केल्याचे समाेर आले आहे. मात्र ठाकरेंनी त्यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिल्याचा दावा, एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिंदे गटाने मात्र हे वृत्त धुडकावून लावले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत बंडखाेरी केली. यानंतर एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाली. यानंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्ष चिन्ह देखील एकनाथ शिंदे गटाने हिसकावून घेतले. आता शिंदे गटात राजकीय गुंतागुंत वाढू लागला आहे. राजकीय समीकरणे बिघडण्यास सुरूवात झाली आहे. यातूनच शिंदे गटातील 12 आमदारांनी ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती समाेर आली आहे. तसे एका इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.
या वृत्तातील दाव्यानुसार उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 27 जुलैला शिंदे गटातील काही आमदारांनी उद्धव ठाकरे यांना भेटणार हाेते. ठाकरेंना प्रत्यक्ष भेटून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार हाेते. यासाठी त्यांनी माताेश्रीवर संपर्क साधला हाेता. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारली.
उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेची दबाव देत ही भेट नाकरल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार तथा राज्याचे उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी भेटीचा दावा फेटाळून लावला आहे. ‘आमच्यापैकी एकानेही उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. उलट उद्धव ठाकरे यांच्या गटातील दहा आमदार आमच्या संपर्कात आहे. एकनाथ शिंदे यांना फाेन करून त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यातील सहा आमदार लवकरच शिंदे गटात येतील. मी त्यांच नावे देखील सांगू शकताे. पण राजकारणात नैतिकता पाळायची असते’, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.