शरद पवार यांचे एके काळचे स्वीय सहायक, सहकारी आणि सध्या अजित पवार गटाचे नेते मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. आगामी काळात शरद पवार आणि अजित पवार गटातील संघर्ष अधिक तीव्र हाेणार असे चित्र आहे.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, “शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री हाेता आले नाही. आपल्याकडे शरद पवारांसारखे उत्तुंग नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात”. देशात शरद पवार यांच्यासारखा उंचीचा नेता काेणीही नाही. पण महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना बहुमत दिले नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री हाेता आलेले नाही. ममता बाॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाले आहेत, असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.
अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष पुढे जात आहेत. आपल्याकडे शरद पवारांसारखे उत्तुंग नेते आहेत. मात्र आपले फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात. नंतर काेणाशी तरी आघाडी करावी लागते, असे म्हणून दिलीप वळसे पाटील शरद पवारांवर टीकास्त्र साेडले आहे. शरद पवार यांना मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्यादांच लक्ष्य केले आहे.