राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या फुटीनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील शीतयुद्धाने आता पेट घेण्यास सुरूवात केली आहे. शरद पवार यांनी राज्यात सभा घेण्याचा धडाका सुरू केला आहे. छगन भुजबळ यांच्या येवले, धनंजय मुंडे यांच्या बीडनंतर आता शरद पवार हे हसन मुश्रीफ यांच्या काेल्हापूरच्या बालेकिल्ल्यात सभा घेत आहेत. शरद पवार यांना राेखण्यासाठी आता अजित पवार हे मैदानात उतरले आहे.
अजित पवार गट आणि त्यांचे कार्यकर्ते फलकांवर शरद पवार यांचे फाेटाे वापरत हाेते. त्यावरही शरद पवार यांनी तंबी दिली आहे. माझे फाेटाे वापरू नका, असा संताप शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. यानंतर शरद पवार यांनी सभांचा धडाका लावला आहे. शरद पवार हे गर्दी खेचत आहेत. यामुळे अजित पवार गटाला धडकी भरली आहे. शरद पवार यांना राेखण्यासाठी अजित पवार हे देखील मैदानात उतरले आहे. अजित पवार यांची 27 ऑगस्टला बीडमध्ये सभा हाेत आहे. या सभेचा टीझर लाॅंच करण्यात आला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी हा टीझर लाॅंच केला आहे. तसा त्यांनी ताे त्यांच्या समाज माध्यमांवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे, यात टीझरमध्ये शरद पवार यांचा फाेटाे वापरण्यात आलेला नाही.
जाहीर सभा ..!
सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची, अस्मितेची, सन्मानाची अन दुष्काळ मिटवण्याची…!मी येतोय, तुम्ही येताय ना…?#Teaser_2 pic.twitter.com/rLvCey9gHj
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 24, 2023
या टीझरमध्ये जाहीर सभा…! सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची, अस्मितेची, सन्मानाची अन दुष्काळ मिटवण्याची..! मी येतोय, तुम्ही येताय ना..? अशी टॅगलाईन देत सभेचा टीझर प्रसिध्द केलाय. पण या टीझरमध्ये शरद पवारांचा फोटो वापरण्यात आलेला नाही.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले. भाजपबराेबर हातमिळवणी केली. यानंतर राज्यभर अजित पवार गटाने जल्लाेष केला. त्यांचे अभिनंदनाचे फलक झळकले. यावर शरद पवार यांचे फाेटाे वापरले गेले. यावर शरद पवार यांनी संताप व्यक्त केला. माझ्या परवानगी शिवाय काेणीही फाेटाे वापरू नये, अशी तंबी शरद पवार यांनी दिली. मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. या पक्षाचे महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. ज्यांच्याशी माझे आता वैचारिक मतभेद आहेत. त्यांनी यापुढे माझ्या परवानगीनेच माझा फोटा वापरावा. अन्य कुणीही माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरू नये, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.