वीर सावरकर भक्त अभिनेते शरद पाेंक्षे यांनी काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत विखारी शब्दांत टीका केली आहे. राहुल यांचे मूळ आडनाव हे गांधी नसून खान आहे. ते फिराेज खान यांची पिलावळ आहेत, असे ते म्हणाले. शरद पाेंक्षे यांनी केलेल्या विखारी टीकेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथं भारतीय विचार मंचातर्फे प्राेबधन व जनजागृतीसाठी वीर सावरकरांवर आधारित व्याख्यानात ते बाेलत हाेते. पालकमंत्री दादा भुसे हे देखील व्याख्यानाला उपस्थित हाेते.
शरद पाेंक्षे म्हणाले, “एक तर तू गांधी नाही अन् सावरकर पण नाही. हे ओरिजनल गांधी नसून खान आहेत. ते महात्मा गांधींचे वंशज नाहीत. त्यांनी त्यांच्या आडनावाचा फायदा घेतला आहे. ही फिराेज खान यांची पुढची पिलावळ आहे. हात त्यांचा इतिहास आहे”. या मूर्खांना स्वतःच्या आजीचा इतिहास देखील माहिती नाही. त्यांना सावरकरांचा इतिहास काय माहिती असेल? असा सवाल देखील शरद पाेंक्षे यांनी केला आहे. राफेल प्रकरणात त्यांना सर्वाेच्च न्यायालयात माफी मागावी लागली आहे. अपिल करण्याची संधी असेपर्यंत हे न्यायालयात माफी मागतात. सावरकर यांच्या प्रकरणात हेच झाले, असेही पाेंक्षे म्हणाले.
शरद पाेंक्षे यांचे मी नथुराम गाेडसे बाेलताेय, हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणण्याची घाेषणा केली आहे. हे नाटक वादग्रस्त ठरले हाेते. या नाटकाच्या प्रयाेगाला वारंवार विराेध झाला हाेता. हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणणार असल्याची घाेषणा शरद पाेंक्षे यांनी समाज माध्यमांवर पाेस्ट शेअर करत केली आहे.