संमतीच्या वयासंदर्भात विधी आयाेगाने आपला अहवाल केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाला सादर केला आहे. यात विधी आयाेगाने मुलींच्या संमतीच्या वयावर माेठे भाष्य केले आहे. सध्याचे समंतीचे वय 18 वर्षे असून, त्यात कपात केल्यास त्याचे विपरित परिणाम हाेतील, असा धाेक्याचा इशारा विधी आयाेगाने अहवालात नमूद केला आहे.
लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यातंर्गत (पाेस्काे) सध्या अंमलात असलेले संमती वय कायम ठेवण्यावर विधी आयाेगाने आपले मत अहवालाद्वारे मांडले आहे. हे वय कायम ठेवण्याची शिफारस 22 व्या विधी आयाेगाेन सरकारला केली आहे. सध्याच्या संमती वय 18 वर्षे यात कपात केल्यास त्याचा विपरीत परिणाम हाेईल. बालविवाह आणि मुलांच्या तस्करीविराेधातील लढ्यामध्ये अडथळे निर्माण हाेतील. तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 मध्ये काही चांगल्या सुरधाणा करण्याची शिफासर विधी आयाेगाने केली आहे. तशी ती गरज असल्याचेही म्हटले आहे.
16 वर्षांवरील अज्ञान मुली प्रेमात पडून पळून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा घटना गंभीर स्वरूपाच्या आहेत. या घटनांची दखल घेत कर्नाटक आणि मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने विधी आयाेगाला सुधारणा करण्याची शिफारस केली हाेती. यासंदर्भात विधी आयाेगाने या विषयाचा सर्वांगीण विचार केला. यानंतर विधी आयाेगाने शिफारसींचा अहवाल सादर केला. विद्यमान संमती वयामध्ये बदल करणे याेग्य नसल्याचे मत आयाेगाने व्यक्त केले आहे.