वेगवान इंटरनेटचा काळ आहे. भारतात सध्या पाईव्ह-जी नेटवर्क सुरू आहे. देशातील रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दाेन टेलिकाॅम कंपन्या आपल्या ग्राहकांना पाईव्ह-जी (5G) नेटवर्कची सुविधा पुरवत आहे. आता सीक्स-जी (6G) नेटवर्कबद्दल देखील माेठी अपडेट समाेर आली आहे.
देशाचे केंद्रीय दळणवळ व इलेक्ट्राॅनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी साेमवारी भारतात सीक्स-जी (6G) अलायन्सच्या लाॅन्चिंगची घाेषणा केली. पाईव्ह-जीच्या (5G) यशस्वी अंमलबजावणीनंतर भारतात पुढील जनरेशनची टेक्नाॅलाॅजी लाॅन्च करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे.
भारत 6G अलायन्स, दूरसंचार टेक्नलाॅजी प्रगत करण्याच्या आणि भारतात 6G च्या डेव्हलपमेंटला पुढे नेण्याच्या उद्देशानं सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील तसेच इतर विभागांमधील प्रमुख भागधारकांना एकत्र आणणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 6G टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. ज्यात आधीपासूनच 200 पेक्षा जास्त पेटंट मिळवले आहेत, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
भारत 6G अलायन्सशिवाय सरकार येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये दूरसंचारमध्ये काही सुधारणा करण्याच्या दृष्टीने योजना तयार करत आहे. 6G चे अपेक्षित आगमन पाईव्ह-जी (5G) पेक्षा जवळपास 100 पट अधिक वेग प्रदान करेल, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी मार्चमध्ये 6G व्हिजन डॉक्युमेंटचे लॉन्चिंग केले होते. केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये 2.70 लाख पाईव्ह-जी (5G) साइट्सच्या स्थापनेसह पाईव्ह-जी (5G) नेटवर्क त्वरित सुरु करण्यात भारताच्या यशाची माहिती दिली.