अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथील लेफ्टनंट साैरभ भागुजी औटी यांचे जम्मू-काश्मीरमधील लडाख इथं अपघाती निधन झाले. राळेगणसिद्धी इथं साेमवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. लष्कार दाेन वर्षांपूर्वी भरती झालेल्या साैरभ यांच्यावर निराेप देण्याची वेळ आल्यानं गावकऱ्यांना गहिवरून आलं हाेतं.
कर्तव्यावर असताना साैरभ यांच्या वाहनाला गेल्या आठवड्यात अपघात झाला हाेता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले हाेते. त्यांच्यावर उपचार सुरू हाेते. यातच त्यांचे निधन झाले. लष्करात थेट अधिकारी पदावर निवड हाेणारे साैरभ औटी हे राळेगणसिद्धीमधील पहिले हाेते. एनडीएमधील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दाेन वर्षांपूर्वीच ते अधिकारी म्हणून लष्करात दाखल झाले हाेते. जम्मू येथील १६८ व्या ताेफखआना रेजिमेंटमध्ये दाखल झाले हाेते.
साैरभ यांच्या या यशानिमित्त गावात माेठा सत्कार करण्यात आला हाेता. मात्र दुर्दैवाने दाेनच वर्षात त्यांच्यावर अखेरचा निराेप देण्याची वेळ गावकऱ्यांवर आली. साैरभ औटी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. साैरभ यांचा मृतदेह लष्करी विमानाने पुण्यात आणि तेथून पुढे लष्करी वाहनाने राळेगणसिद्धी इथं आणण्यात आला हाेता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, खासदार डाॅ. सुजय विखे, लष्कर आणि पाेलिस दलातील अधिकारी यावेळी उपस्थित हाेते. साैभर यांचे वडील मुंबई पाेलिस दलात आहेत. पाेलिस निरीक्षक म्हणून ते कार्यरत आहेत.
