KGF-1 आणि KGF-2 च्या यशानंतर चर्चा हाेत आहे, ती KGF-3 ची चर्चा आहे. KGF-3 च्या घाेषणेबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. चित्रपटातील मुख्य अभिनेता यश याने एका मुलाखतीत आता पुन्हा राॅकी भाईच्या भूमिकेत दिसणार नाही, असे सांगितले हाेते. मात्र KGF-3 च्या भागाबद्दल एक नवी अपडेट समाेर आली आहे.
हाेम्बल फिल्म्स निर्मित KGF-3 या चित्रपटाचे चित्रीकरण पुढील वर्षी म्हणजेच 2024 पासून सुरू हाेणार आहे. हाेम्बल फिल्म्सचे मालक विजय किरगांडूर यांनी सुपरहिट KGF मालिकेच्या पुढील भागाची रिलीज डेट नुकतीच जाहीर केली आहे. इतकचे नव्हे, तर या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाची घाेषणा हाेणार असल्याची शक्यता आहे.
विजय किरगांडूर यांनी ‘पीटीआय’शी संवादात याबाबत माेठी अपडेट दिली. ऑक्टाेबर 2024 मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात हाेणार आहे. 2025 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित हाेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. KGF-3 प्री-प्राेडक्शनवर काम सुरू आहे आणि लवकरच याबाबत घाेषणा हाेईल, असेही विजय किंरगांडूर यांनी म्हटले आहे. या घाेषणेमुळे अभिनेता यशचे चाहते खूश झाले आहेत.
KGF-1 आणि KGF-2 चे बाॅक्स ऑफिसवर कलेक्शन जबरदस्त आहे. KGF-1चे जगभरात 238 काेटी रुपयांची कमाई केली. KGF-2 ने 1 हजार 215 काेटी रुपयांची कमाई करत इतिहास रचला हाेता. आता प्रेक्षक KGF-3 बद्दल उत्सुक आहेत.