शाळेतील 95 पेक्षा अधिक विद्यार्थिनी अचानक एका आजारामुळे लंगडू लागल्या आहेत. विद्यार्थिंनीमधील या आजारामुळे आराेग्य विभाग अलर्ट झाला आहे. केनियामध्ये (Kenya) ही परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे केनियाने सेंट थेरेसाज एरेगी गर्ल्स हायस्कूल सध्य तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या आजाराच्या रहस्यामुळे केनियाची आराेग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या आजाराचा शाेध घेण्यासाठी आराेग्य पथकांकडून संशाेधन सुरू असल्याचे केनियाच्या आराेग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.
लंगडत असलेल्या या विद्यार्थिंनींचे रक्त नमुने तपासणीसाठी केनिया मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट ठिकाणी पाठवण्यात आले आहे. या आजाराच्या उत्पत्तीचा शाेध घेतला जाणार आहे. लंगडत असलेल्या विद्यार्थिंनींना याेग्य उपचार मिळाव्यात आणि अन्य काेणला या आजाराची बाधा हाेऊ नये यासाठी शिक्षण विभागा आणि आराेग्य विभाग संयुक्तपणे काम करत आहेत, अशी माहिती प्रादेशिक शिक्षण शिक्षण संचालक जॅरेड ओबिएरो यांनी दिली.
विद्यार्थिंनीमध्ये आढळत असलेला हा आजार पॅरालिसीसचा आहे. ज्या विद्यार्थिंनींना याची लागण झाली आहे, त्यांचा पाय लुळे पडत आहेत. त्यामुळे विद्यार्थिंनींना चालणे अवघड बनले आहे. अडचणी येत आहे. काही विद्यार्थिंनींना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागत आहेत. या लुळ्या पडण्याच्या आजारामुळे घबराट पसरली आहे. वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. आजारी पडलेल्या विद्यार्थिंनींवर उपचार सुरू असल्याचे केनियाच्या आराेग्य विभागाकडून सांगण्यात आले.