Kashmir to Kanyakumari अहमदनगर जिल्ह्यातील सायकलपटू जसमीत वधवा यांनी जम्मू-कश्मीर ते कन्याकुमारी प्रवासाला सुरूवात केली आहे. या प्रवासाला अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. घर घर लंगर सेवेचे हरजीत वधवा यांचे जसमीत हे धाकटे बंधू असून, त्यांची अहमदनगरसह देशात सायकलपटू ओळख आहे. सायकलपटू जसमीत वधवा हे जम्मू-कश्मीर ते कन्याकुमारी या प्रवासासाठी २१ फेब्रुवारीपासून प्रवासाला सुरूवात करत आहे. या प्रवासाला अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातून सुरूवात झाली. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी या प्रवासाला आणि जसमीत वधवा यांच्या सामाजिक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे, घर घर लंगर सेवेचे जनक अहुजा, डॉ.संजय असनानी, प्रीतपाल धुप्पड, कैलास नवलानी,अमोरा वधवा उपस्थित हाेते.
जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी वधावा यांच्या सायकलिंगविषयी माहिती घेतली. हरजीत वधवा यांनी जसमीत याने यापूर्वी मुंबई ते दिल्ली असा सायकलिंग प्रवास केला आहे. आता जम्मू कश्मीर ते कन्याकुमारी असा ३ हजार ७०० किलोमीटरचा सायकलिंग प्रवास १४ दिवसात करणार असल्याची माहिती दिली. मायनस दोन डिग्री ते ४७ डिग्री अशा तापमानाचा हा प्रवास असणार आहे. या सायकलिंग उपक्रमाचा खर्च वैयक्तिकरित्या केला जाणारा असून या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी घर घर लंगर सेवेसाठी तसेच शालेय विद्यार्थिनींना सायकल वाटपासाठी खर्च केला जाणार असल्याचेही हरजीत वधवा यांनी दिली.
