Ahmednagar News ः अहमदनगर महापालिका कामगार युनियनच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड झालेले जितेंद्र सारसर आणि बाबासाहेब मुदगल यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
जनरल सेक्रेटरी आनंद वायकर, माजी अध्यक्ष अनंत लोखंडे, कार्याध्यक्ष दीपक मोहिते, नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, बलराज गायकवाड, महादेव कोतकर, उपाध्यक्ष प्रकाश साठे, आयुब शेख, विजय कोतकर, सूर्यभान देवघडे, अंतवन क्षेत्रे, आकील सय्यद,सागर साळुंखे, अमोल लहारे, बाळासाहेब व्यापारी, अजित तारू, सखाराम पवार, बाबासाहेब राशिनकर, राजेंद्र वाघमारे, बैजू साठे, प्रफुल्ल लोंढे, अजय सौदे उपस्थित होते.
सर्वांना सोबत घेवून महापालिका कामगारांचे विविध प्रश्न मार्गी लावू, असे मनोगत अहमदनगर महापालिका कामगार युनियनचे नवीन प्रभारी अध्यक्ष जितेंद्र सारसर आणि बाबासाहेब मुदगल यांनी व्यक्त केले.
आनंद वायकर म्हणाले, “संघटना ही मनपा कर्मचाऱ्यांची असून ती कामगार चळवळ आहे. या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागत असतात. आपली संघटना एकसंघ आहे. माजी अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी राजीनामा दिला असून सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित निर्णय घेत प्रभारी अध्यक्ष म्हणून जितेंद्र सारसर व बाबासाहेब मुदगल यांची निवड केली आहे”. आज त्यांनी पदभार स्वीकारत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम सुरु केले आहे. कुठलेही प्रश्न प्रलंबित राहणार नसून युनियन नेहमीच कर्मचाऱ्यांच्या सुख दुखात सहभागी राहिल, असे आनंद वायकर यांनी सांगितले.
मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून आचारसंहिता संपल्यानंतर तोही मार्गी लागेल. लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार वारस नोकरीचा प्रश्न न्याय प्रविष्ठ असून तिथे देखील आपल्याला न्याय मिळेल. दोन्ही प्रभारी अध्यक्ष आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, अशी अपेक्षा यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.