महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधी डॉ. जयश्री थोरात यांनी अल्पावधीमध्ये जनसामान्यांची मने जिंकली आहेत. समाजाप्रती असणारी त्यांची तळमळ, विनयशीलता, नम्रता हा त्यांच्यातील गुण हा सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात, विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्याकडून आलेला वारसा आहे. त्यांच्यामध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता असून त्यांना लवकरच थेट जनतेतून निवडून येत आमदार झालेले पाहण्याची काँग्रेस कार्यकर्ते आणि जनतेची इच्छा असल्याचे प्रतिपादन काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. डॉ. थोरात यांची जिल्हा काँग्रेसच्यावतीने काळे यांच्या हस्ते संगमनेर येथील त्यांच्या निवासस्थानी अभिष्टचिंतन करत भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, नगर तालुका काँग्रेसचे ॲड. अक्षय कुलट, जिल्हा खजिनदार मोहन वाखुरे, उपाध्यक्ष अशोक शिंदे, सरचिटणीस स्वप्निल पाठक आदी उपस्थित होते.काळे म्हणाले, “थोरात घराण्याला काँग्रेस विचारांचा मागील शंभर वर्षांचा इतिहास आहे. आज तागायत त्यांनी एकदाही या विचाराशी कधी प्रतारणा केलेली नाही. आ.बाळासाहेब थोरात यांच्यानंतर त्यांच्या विचारांना पुढे नेण्याची क्षमता डॉ.जयश्रीताई यांच्यामध्ये आहे”. संगमनेर जरी त्यांचा मतदारसंघ असला तरी सबंध अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील एक तरुण, सुसंस्कृत, अभ्यासू युवती नेतृत्व म्हणून त्यांच्याकडून राज्यातील काँग्रेसला मोठ्या अपेक्षा आहेत. आमदार थोरात यांच्या कुटुंबाला असणारा जनाधार आणि लोकप्रियता पाहता मागच्या दाराने नव्हे तर थेट जनतेतून निवडून येत त्या लवकरच आमदार व्हाव्यात अशा शुभेच्छा त्यांना जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आहेत. आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जेवढे प्रेम आ. थोरात यांना दिले तेवढेच प्रेम कार्यकर्ते डॉ.जयश्रीताई यांना सुद्धा देत असल्याची भावना यावेळी काळे यांनी व्यक्त केली.
Trending
- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक