instagram हे युवकांमध्ये सर्वाधिक लाेकप्रिय साेशल मीडिया अॅप आहे. रील्स फिचर हे अॅपमधील सर्वाधिक पसंतीचा भाग आहे. कित्येक यूजर्स हे स्वतःही रील्स बनवतात. कित्येकजण या माध्यमातून चांगली कमाई करतात. instagram युजर्सना एक खुशखबर दिली आहे. instagram क्रिएटर्ससाठी एक नवीन फीचर असणार आहे.
रील्सची वेळ ही तीन मिनिटांवरून आता 10 मिनिटे हाेणार आहे. मेटा कंपनीकडून instagramवर याच्या अपडेटची चाचणी सुरू आहे. instagramवर सध्या तीन मिनिटापर्यंत लांबीचा व्हिडिओ पाेस्ट करता येताे. त्यामुळे क्रिएटर्सना आपला व्हिडिओ अधिक सविस्तर बनवता येत नाही. दहा मिनिटापर्यंत हा वेळ वाढवल्यास इन्फ्ल्युएन्सर्स अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त हाेऊ शकतील.
एज्युकेशनल व्हिडिओ, टिप्स, हॅक्स सांगणारे व्हिडिओ, कुकिंग व्हिडिओचे कंटेंट तयार करणाऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा हाेणार आहे. मेटाकडून या फिचरची चाचणी सुरू असून, ते कधी लाॅंच हाेईल, याबाबत अद्याप माहिती समाेर आलेली नाही.