जानेवारी २०२३ मध्ये खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने किरकोळ महागाईने तीन महिन्यांचा विक्रम मोडला आहे. सरकारने सोमवारी ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर केली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) कमाल मर्यादेपेक्षा ही जास्त आहे.
रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाई दर ४ टक्के ठेवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्याचबरोबर महागाईची व्याप्ती २ ते ६ टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याची मर्यादा आहे. जानेवारीपूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये किरकोळ महागाई ५.७२ टक्के होती.
देशाच्या ग्राहक किंमत निर्देशांकात फक्त अन्न किंमत निर्देशांकाचा सुमारे ४० टक्के हिस्सा आहे. याचा अर्थ देशातील महागाई वाढण्यास किंवा कमी होण्यास खाद्यपदार्थांच्या किमती हा एक मोठा घटक आहे. जानेवारी २०२३ ची आकडेवारी पाहिली तर जानेवारीत अन्नधान्य महागाई दर 5.94 टक्के होता. तर डिसेंबर २०२२ मध्ये अन्नधान्य महागाईचा दर ४.१९ टक्के होता.
Trending
- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक