प्रबाेधनकार निवृत्ती देशमुख महाराज ऊर्फ इंदुरीकर महाराज हे आपल्या परखड वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी राजकारणातील करिअरवर भाष्य केले आहे आणि त्यांचे हे भाष्य सध्या चर्चेत आहे. हे भाष्य करताना राजकारण्यांना चांगलेच टाेले लगावले आहेत.
‘आमदार हाेण्यासाठी दाेन-चार कारखाने, पाच-सहा काॅलेज लागतात’, असे वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केले आहे. जळगावच्या चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आयाेजित केलेल्या कीर्तनात ते बाेलत हाेते.
इंदुरीकर म्हणाले, “आता काेणताही पक्ष असा राहिला नाही की, काेण काेणत्या पक्षात काम करताे, हेच कळत नाही. काेण काेणत्या पक्षात, काेण काेणाचा कार्यकर्ता, नेता हे काहीच कळत नाही”. पक्ष काेणताही असु द्या, आपल्याला आपली मासणे संभाळायची आहेत, असेही इंदुरीकर म्हणाले. आता कधीही नवा पक्ष निघू शकताे. पक्ष राहिला नाही. राजकारण आता अवघड झाले आहे, असेही इंदुरीकर महाराज म्हणाले.
राजकारण अवघड झाले आहे. त्यामुळे तुम्ही फक्त धर्मासाठी जागा, असा सल्ला इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे. आता आमदार हाेण्यासाठी दाेन-चार कारखाने, पाच-सहा काॅलेज लागतात. तसेच 100-200 पतसंस्था, 100-150 बचत गट आणि एक हजार कर्मचारी हाताखाली लागतात. तेव्हा आमदार हाेता येते, असे इंदुरीकर महाराज म्हणाले.
जळगावचे आमदार मंगेश चव्हाण हे जनतेच्या आशीर्वादावर आमदार झाले आहेत. टाेटल आमदारांचे वाढदिवस माझ्याकडे असतात, असेही इंदुरीकर महाराज म्हणाले.