Ahmednagar “राज्यात काेणतेही पहिले संकट आले, तर ते शिक्षकांवर येते. खासगीकरणाचे संकट देखील तसेच आहे. या संकटाला विराेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली राज्यभरात शिक्षक एकटवला आहे. याची दखल सरकारला घ्यावीच लागेल आणि हा समाज व्यवस्थेला घातक असलेला शाळा खासगीकरणाचा निर्णय मागे घ्यावाच लागले. सरकारने शाळा खासगीकरणाचा हट्ट न साेडण्यास प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून राज्यभर तीव्र आंदाेलन उभे राहिल”, असा इशारा प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते संजय कळमकर यांनी दिला.
शाळा खासगीकरणाविराेधासह इतर मागण्यांसाठी आज, साेमवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षक नेते संभाजीराव थाेरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आक्राेश माेर्चा काढण्यात आले. अहमदनगरमध्ये देखील माेर्चा काढण्यात आला. राज्य नेते संजय कळमकर आणि राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप यांनी माेर्चाचे नेतृत्व केले. सावेडीतील गुलमाेहर रस्त्यावरील आनंद शाळापासून माेर्चा पायी निघाला हाेता. शाळा खासगीकरणाविराेधात माेर्चात सहभागी झालेल्या शिक्षकांनी जाेरदार घाेषणाबाजी केली. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा आल्यानंतर तिथं सभेत रुपांतर झाले. माेर्चातील शिक्षकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी यांना निवेदन दिले.
राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब झावरे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सालके, सुदर्शन शिंदे, भास्कर नरसाळे, संगीता कुरकुटे, जयश्री झरेकर, राजेंद्र ठाणगे, प्रवीण ठुबे, अविनाश निंभाेरे, सुभाष तांबे, रघुनाथ झावरे, बाळासाहेब देंडगे, अमाेल साळवे, उषा बांडे, शशिकांत आव्हाड, स्वाती गाेरे, सुनीता काटकर, अंबादास गारुडकर आदी प्रमुख मंडळीसह शेकडाे शिक्षक-शिक्षका आक्राेश माेर्चात सहभागी झाले हाेते. राष्ट्रवादीचे प्रकाश पाेटे यांनी आंदाेलनस्थळी येत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा पाठिंबा असल्याचे सांगितले.
गुरूजींचा सरकारला शाप लागणारशिक्षकांबाबत राज्यात नेहमीच दुर्दैवी निर्णय हाेतात. आता खासगीकरणाचे संकट देखील त्याचाच भाग आहे. यामागे काेण आहे, याची प्रत्येक शिक्षकाला कल्पना आहे. आता आम्ही शिक्षक एकवटलाे आहाेत. आणि आमच्याबराेबर काही गडबड केल्यास आमच्याकडे उपद्रव मूल्य देखील आहेत, असा इशारा दिला. खासगीकरण, कंत्राटीकरण आणि व्यापारीकरण न थांबवल्यास या गुरूजींचा सरकारला शाप लागेल.
आबासाहेब जगताप,
राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ
संजय कळमकर म्हणाले, “शाळा खासगीकरणाच्या निर्णया विराेधात संभाजीराव थाेरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात शिक्षक आज रस्त्यावर उतरला आहे. सरकार शाळेसंबंधी करत असलेले वेगवेगळे प्रयाेग हे थेट समाजावर परिणाम करणारा ठरणारा आहे”. आम्ही गुरूजी एकत्र आलाे आहाेत. आम्ही दहा गुरूजी एकत्र आल्यावर याचा शाळा दत्तक घेऊ शकताे. गुरूजींनी शाळा दत्तक घेतल्यावर त्यांचेच निर्णय मान्य करावे लागतील. बदली, प्रमाेशन, सर्व काही निर्णय तेच घेतील, हे सरकारला मान्य हाेईल का? शाळा खासगीकरणाचा हा निर्णय थेट समाज व्यवस्थेवर परिणाम करणारा आहे. या शाळा कारखानदारांकडे जाणार आहेत. या शाळांकडे माेठ्या जागा आहेत. त्या जागा अप्रत्यक्षपणे कारखानदारांचा ताबा येईल आणि हे धाेक्याचे आहे, असेही कळमकर म्हणाले.
प्रशांत बंब यांना कळमकरांचे शब्दबाण!
संजय कळमकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत आमदार प्रशांत बंब यांच्यावर नाव न घेता टीका केली. आभाराचे भाषण आटाेपत असताना, त्यावेळी शिक्षक आंदाेलकांनी कळमकर यांचे बंब यांच्याकडे लक्ष द्या, असे सांगितले. त्यावेळी आमदार बंब यांची काहीच चुक नाही, असा उपराेधाक्त टाेला कळमकर यांनी लगावला. “बंब यांनी ज्या गुरूजींनी शिकवले, त्यांना अगाेदर शाेधावे लागेल. त्यांचे आभार मानावे लागतील. हा बंब लवकर विझणार नाही. ताे पेटताच राहणार. तुडतुड बाेलत राहणार. त्यामुळे त्याकडे लक्ष देवू नकाे”, असा सल्ला शिक्षकांना दिला. त्यावेळी आंदाेलनस्थळी शिक्षकांमध्ये एक हसू पसरले.
‘काेणतेही पहिले संकट येते ते शिक्षकांवरच येते. या संकटांचा सामना करायचा असेल, तर शिक्षकांनी घरी बसून चालणार नाही, असे सांगून इंग्रजांनी आपली माणसे आपल्यांवर साेडली हाेती. आताही तेच हाेत आहे. आपल्याच लाेकांनी आपल्याविराेधात कारवाया थांबवल्या पाहिजेत’, असे आवाहन संजय कळमकर यांनी केले. अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांच्या स्थानिक प्रश्नांवर लवकरच विराट माेर्चा काढण्यात येईल, असेही संजय कळमकर यांनी यावेळी जाहीर केले.