जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) परिषदेची 50 वी बैठक झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले. यात सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे, चित्रपटागृहात दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवरील जीएसटी संदर्भात झाला.
या बैठकीत चित्रपटगृहातील खाद्यपदार्थांवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच काही जीवरक्षक औषधांच्या आयातीवरील करात सूट देण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. चित्रपटगृहामध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरील कर 18 टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रेक्षकांच्या खिशावरील भार कमी हाेणार आहे.
याचबराेबर कर्कराेगावरील औषध डिनुटक्सिमॅब आणि इतर दुर्मिळ आजारांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या फूड फाॅर स्पेशल मेडिकल पर्पजच्या आयतीवर जीएसटीमध्ये सूट देण्यात येणार आहे. जीएसटी परिषदेत तशी मान्यता देण्यात आल्याची माहिती पश्चिम बंगालचे अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी दिली. याशिवाय ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो (जुगाराचा प्रकार) आणि घोड्यांच्या शर्यतींवर २८ टक्के कर लावण्यासही परिषदेने सहमती दर्शवली आहे.