International Women’s Day ः भाजप खासदार सुजय विखे यांनी नारीशक्तीसमोत नतमस्तक झाले. नवनागापूर (ता. नगर) येथे जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित सांस्कृतिक महोत्सवाला महिलांचा प्रतिसाद मिळाला. महिलांच्या उत्स्फूर्त गर्दीने नवनागापूर परिसर अगदी फुलून गेला होता.
महिला संघटन करणाऱ्या अरुणा कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अर्चना नांगरे आघाव, कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या उज्वला ठोंबरे, श्रीराम विद्यालय राळेगण येथे मुख्याध्यापिका या पदावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तारका रंगनाथ भापकर, शिवव्याख्याता प्रणाली बाबासाहेब कडूस, कोविड काळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉ. निवेदिता माने, अंगणवाडी सेविका विद्या दुसुंगे, युवा वैज्ञानिक श्रुतिका धनंजय दळवी, शिक्षिका सविता मधुकर बोरकर, महिला संघटन करणाऱ्या अनिता आदिनाथ बनकर, महिला सक्षमीकरणासाठी भरीव योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधू राजेंद्र वाणी, सोनाली योगेश गहिले, स्मिता मंगेश करडे, सुमन साहेबराव सप्रे, मिरा ज्ञानदेव शेळके, लाकडी घाण्यावरून तेल काढण्याचा व्यवसाय सुरू करून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या अश्विनी कोळपकर, गृह उद्योग सुरू करणाऱ्या मिना बेरड, जगदंबा महिला स्वयंसहायताच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या मिना गणेश काटे, सोनूबाई विजय शेवाळे, कोमल वाकळे, प्रणाली बाबासाहेब कडुस आदी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
संगीतकार अजय-अतुल या जोडीने उपस्थित महिलांना आपल्या गाण्यावर ताल ठेका धरण्यात भाग पाडले. तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मानसी नाईक यांनी आपल्या नृत्याने उपस्थितांचा उत्साह वाढविला. या सांस्कृतिक महोत्सवात महिलांचे मनोरंजन करण्याच्या अनुषंगाने आयोजित या कार्यक्रमांव्यतिरिक्तय लकी-ड्रॉ स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महिलांना पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसे देखील देण्यात आली. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अजय-अतुल यांच्या झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर खासदार डॉ. सुजय विखे, नगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले यांनी आणि त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांनी ठेका धरला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.