अहमदनगरमध्ये नवीन होंडा एसयूव्हीची एक्स-गाडी दाखल झाली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी या गाडीचे स्वागत केले. ग्रीन-वे हाेंडा शाेरूममध्ये ही गाडी दाखल झाली आहे. ‘ही गाडी नगरकरांच्या पसंतीला उतरेल’, अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, “अहमदनगर जिल्हा हा प्रगतशील आहे. होंडा मोटर्स कंपनीने ग्राहकांसाठी वेगवेगळे मॉडेल उपलब्ध करून दिले आहे. आता होंडा एलिव्हेट गाडी अहमदनगर शहरातील ग्रीन-वे होंडा शोरूममध्ये दाखल झाली आहे. ही गाडी नगरकरांच्या नक्कीच पसंतीत उतरेल.”
ग्रीन-वे होंडा शोरूमचे संचालक योगी सबलोक म्हणाले, “नवीन होंडा एसयूव्हीची एक्स-गाडी चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आहे. ज्यामध्ये एसव्ही-व्ही, व्हीएक्स आणि झेडएक्स यांचा यामध्ये समावेश आहे. या गाडीची किंमत 10 लाख 99 हजार 900 रुपयांपासून सुरवात होते. या सर्व प्रकारांमध्ये समान 1.5, एल4- सिलिंडर नैसर्गिकरीत्या अॅस्पिरेटेड, आय-व्हिटेक पेट्रोल इंजिन आहे. जे 121 पीएस पॉवर आणि 145 एनएम टॉर्क जनरेट करते.” हायवेवर कारचे मायलेज 16 ते 17 किलोमीटर प्रतिलिटर आहे. कंपनीने सात मोनोटोन कलर पर्यायांमध्ये एलिव्हेट सादर केली आहे. एंट्री लेव्हलला एसव्ही व्हेरियंटमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी टेललाईटस्, 17- इंच व्हील कव्हर्स, ऑटोमॅटिक एअर कंडिशनिंग, पुश बटण स्टार्टस्टॉप, आरामदायक फॅब्रिक अपहोल्स्ट्री, पीएम 2.5 एअर फिल्टरेशन, आडस फंक्शन यासह सर्व मूलभूत वैशिष्ट्ये आहेत, असे सबलाेक यांनी सांगितले.
गाडी मागील पार्किंग सेन्सर्स आणि 60.40 फोल्डिंग मागील सीट समाविष्ट आहेत. यात ड्युअल फ्रंट एकूण 6 एअरबॅग्ज, व्हेईकल स्टॅबिलिटी प्रोग्राम आणि हिल स्टार्ट असिस्टसह सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. जागतिक स्तरावर एलिव्हेटचे स्वागत होत आहे. त्यामुळे भारतात या गाडीची आतुरतेने वाट पाहण्यात येत होती. एलिव्हेट एक धाडसी स्टायलिश एसयूव्ही आहे. आकर्षक ड्रायव्हिंगसह केबिनमधील आरामदायक अनुभव गतिशीलता आणि सुरक्षितता याला प्राधान्य देण्यात आले आहे.