Honda Motorcycle आणि Scooter India कंपनीने एक 2023 Honda Livo लाँच केली आहे. या नवीन Honda Livo मध्ये 110cc OBD2 कॉम्प्लायंट इंजिन एन्हांस्ड स्मार्ट पॉवरसह आहे. यात इंटिग्रेटेड इंजिन स्टार्ट/स्टॉप स्वीच, 5-स्टेप अॅडजस्टेबल रिअर सस्पेंशन, लक्षवेधी नवीन ग्राफिक्स, आधुनिक फ्रंट व्हिझर आणि प्रभावी टेललॅम्प्स यासह अनेक विशेष फीचर्स देखील आहेत.
नवीन Livo मोटरसायकलमध्ये 110 cc सेगमेंटमधील सर्वात स्टायलिश आणि अॅडव्हान्स फीचर्स आहेत. यात स्टाइल, आराम आणि यांचा कॉम्बो आहे. तिची एक्स-शोरूम किंमत 78 हजार 500 रुपयांपासून सुरू होते. अॅथलेटिक ब्लू मेटॅलिक, मॅट क्रस्ट मेटॅलिक आणि ब्लॅक कलर पर्यायांमध्ये उपलब्ध, नवीन Honda Livo ची किंमत ड्रम व्हेरियंटसाठी 78 हजार 500 रुपये आणि डिस्क व्हेरियंटसाठी 82 हजार 500 रुपये आहे.
या नवीन Honda Livo बाइकसोबत 10 वर्षांचे वॉरंटी पॅकेज उपलब्ध आहे. यामध्ये 3 वर्षांची स्टँडर्ड आणि 7 वर्षांची ऐच्छिक विस्तारित वॉरंटी आहे. या बाइकची डिलिव्हरी लवकरच सुरू होणार आहे. नवीन Honda Livo च्या लूक आणि फीचर्स आकर्षक आहे. नवीन ग्राफिक्स, आधुनिक फ्रंट व्हिझर आणि टेललॅम्प ही मोटरसायकल पाहण्यासारखे आहे. डिझाईन स्पोर्टी लुकमध्ये तयार केले आहे. DC हेडलॅम्प देण्यात आला असून, त्याचा प्रकाश जास्त आहे.
या नवीन Honda Livo बाईकची सीटची उंची 657 मिमी आणि ग्राउंड क्लियरन्स 163 मिमी आहे. यात सर्व्हिस ड्यू इंडिकेटर सारखे फीचर्स देखील आहेत. नवीन Livo ACG स्टार्टर मोटरसह सायलेंट स्टार्ट, CBS, प्रोग्राम केलेले इंधन इंजेक्शन, सोलेनोइड वाल्व्ह आणि ट्यूबलेस टायर्स यांसारख्या फीचर्ससह देखील येते.