सहा वर्षांपूर्वी थांबलेले ‘मी नथुराम गाेडसे बाेलताेय’ पुन्हा रंगभूमीवर येत आहे. या नाटकाला सातत्याने विराेध हाेत आला आहे. तरी देखील या नाटकाचे हजार प्रयाेग झाले आहेत. मी नथुराम गाेडसे बाेलताेय, पुन्हा रंगभूमीवर येत आहे, अशी घाेषणा अभिनेता शरद पाेक्षेंनी समाज माध्यमांवर घाेषणा केली.
नथुराम गाेडसे यांची भूमिका शरद पाेक्षें साकारायचे.’मी नथुराम गाेडसे बाेलताेय’ या नाटकाला सातत्याने विराेध झाला आहे. राजकी आणि सामाजिक क्षेत्रातून विराेध पत्कारून देखील या नाटकाचा सातत्याने वाटचाल सुरू आहे. या नाटकाचे प्रयाेग हजार प्रयाेगापर्यंत झाली आहे.
‘मी नथुराम गाेडसे बाेलताेय’ या नाटकाचे प्रयाेग 2017 साली थांबवण्यात आले हाेते. आता यंदा ऑक्टाेबरमध्ये पुन्हा नव्याने हे नाटक रंगभूमीवर येणार आहे. ‘मी नथुराम गाेडसे बाेलताेय’ या नवीन नाटकाचे दिग्दर्शन विवेक आपटे करणार आहेत.
शरद पाेंक्षे म्हणाले, “आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा खूप खूप शुभेच्छा. मी आनंदाची बातमी देत आहे. 11 मार्च 2018 ला मी नथुराम गाेडसे बाेलताेय या नाटकाचा शेवटचा प्रयाेग केला. यानंतर जाहीर केले की, मी यापुढे रंगभूमीवर नथुरामच्या भूमिकेत कधीही दिसणार नाही. मी त्या शब्दाशी प्रामाणिक राहिलाे. गेली साडेपाच वर्षे मी हे नाटक केले नाही. परंतु पाच वर्षे महाराष्ट्रात व्याख्यानाच्या निमित्ताने फिरताना अनेकांनी नाटकाचे प्रयोग करा, असे सुचवले. पुढच्या पिढ्यांना हे नाटक पाहायचे आहे. थाेडे तरी प्रयाेग करा, असे वारंवार लाेक मला सांगत हाेते”.
शरद पाेंक्षे यांनी मी फक्त 50 प्रयोगांसाठी ‘नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर 2023 संपूर्ण महाराष्ट्रात ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’, या नाटकाचे प्रयोग करणार आहे.