Close Menu
Kharee GoshtKharee Gosht
    What's Hot

    Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…

    May 4, 2024

    Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड

    May 4, 2024

    Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा

    May 4, 2024
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
    • Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
    • Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
    • Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
    • Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
    • Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
    • Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
    • Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक
    Kharee GoshtKharee Gosht
    Wednesday, July 9
    • Home
    • खरी गोष्ट
    • ताज्या बातम्या
    • महाराष्ट्र
    • शैक्षणिक
    • अर्थ
    • मनोरंजन
    Kharee GoshtKharee Gosht
    Home»खरी गोष्ट

    हृदयद्रावक, कचऱ्यात पडलेल्या आजाेबांना जीवनदान!

    Kharee GoshtBy Kharee GoshtJune 28, 2023 खरी गोष्ट No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook WhatsApp Twitter LinkedIn Pinterest Email

    पोटात कणभरही अन्न नाही. अनेक दिवसांपासून एकाच जागेवर पडून असल्याने शरीरावर जखमा झाल्या हाेत्या. अतिशय ह्रदयद्रावक अवस्था! अहमदनगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका कोपऱ्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ पडलेल्या आजाेबांची ही स्थिती हाेती. आतून ते मदतीसाठी आकांताने ओरडत होते. त्यांची ती आर्त हाक कुणालाही ऐकायला येत नव्हती. मात्र ही हाक ऐकली विजय फिराेदे यांनी.

    आजाेबांची अवस्था पाहून विजय यांचे डाेळे पाणावले. काय करावे हे सुचेना, असे झाले. परंतु विजय यांना आजाेबांची अवस्था पाहून स्वस्थ्य देखील बसवत नव्हते. आजाेबांच्या मदतीसाठी त्यांनी अहमदनगरमधील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे दिलीप गुंजाळ यांना फाेन केला. आजाेबांच्या स्थितीविषयी माहिती दिली. दिलीप गुंजाळ यांनी याची दखल घेत त्यांनी संस्थेतील स्वयंसेवक राहुल साबळे, स्वप्नीन मधे यांना बेवारस निराधार जखमी वयाेवृद्ध आजाेबांच्या मदतीसाठी पाठवले.

    स्वयंसेवक राहुल साबळे यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून काेतवाली पाेलिसांना माहिती दिली. पाेलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. आजाेबा ज्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ हाेते, तिथे माेठ्याप्रमाणात दुर्गंधी येत हाेती. पावसामुळे हा कचरा अधिकच कुजला हाेता. त्यामुळे दुर्गंधीचे प्रमाण माेठे हाेते. तिथे काेणीही जावू शकत नव्हते. मात्र अमृतवाहिनीच्या स्वयंसेवकांनी कशाचीही तमा न बाळगता आजाेबांना त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारून बाहेर काढले. भूक भागविण्यासाठी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेले अन्नपदार्थ खाण्यासाठी आजाेबा तिथपर्यंत पाेहाेचले असावेत आणि शारीरिक दुर्बलपणामुळे ते तिथेच पडून राहिले असावे, असा अंदाज अमृतवाहिनीच्या स्वयंसेवकांनी व्यक्त केला.

    संस्थेच्या स्वयंसेवकांनी आजोबांना बाहेर काढून तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आजाेबा बाेलण्याच्या मनस्थितीत नाही. आजोबांची ह्रदयाला वेदना देणारी परिस्थिती पाहिल्यावर जणू काही माणसातलं माणूसपण हरवत चाललंय, अशी प्रतिक्रिया अमृतवाहिनीच्या स्वयंसेवकांनी व्यक्त केली.

    आपापसांत एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. आजोबांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचाराला ते प्रतिसाद देत आहेत. आजोबांच्या तब्बेतीत सुधारत असून, ते स्थिर आहे, अशी माहिती माहिती अमृतवाहिनीचे दिलीप गुंजाळ यांनी दिली.

    Share. Facebook WhatsApp Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kharee Gosht

      Keep Reading

      Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड

      Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक

      Maharashtra Day ः शिवाजी महाराजांच्या जीवनावर रेखाटली रांगोळी

      Lok Sabha Election 2024 ः हाॅटेलमधून 60 हजार जप्त; तिघांविरोधात गुन्हा दाखल

      Good News ः आंब्याला उच्चांकी दर

      Ahmednagar News ः व्हॅक्यूम क्लिनरने वस्तू संग्रहालयास स्वच्छता होणार

      Add A Comment
      Leave A Reply Cancel Reply

      Editors Picks

      Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…

      May 4, 2024

      Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड

      May 4, 2024

      Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा

      May 4, 2024

      Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले

      May 4, 2024
      Latest Posts
      © 2025 Kharee Gosht
      • Privacy Policy
      • Terms
      • Accessibility

      Type above and press Enter to search. Press Esc to cancel.